आयब्रोज करताना काही जणींना खूपच त्रास होताे. केस ओढले गेल्याने भुवयांभोवतीची सगळी त्वचा गुलाबी गुलाबी होते... डोळ्यांतून पाणी येतं.. अगदी जीव नको नकोसा होऊन जातो.. दरवेळी आयब्रोज (how to reduce pain while doing eyebrows) करण्याआधी हा त्रास आठवतो. पण आता सौंदर्याच्या दृष्टीने निदान एवढं तरी स्वत:कडे लक्ष देणं गरजेचं असल्याने आपणही हा सगळा त्रास सोसतो.. पण हा त्रास, वेदना कमी करण्याचेही काही पर्याय आहेत. हे काही उपाय करून बघा, आयब्रोज करताना होणारा त्रास खूप कमी होईल..
१. तेथील त्वचा चोळा
आयब्रोज करण्याच्या आधी ४- ५ मिनिटे भुवयांच्या आसपासची त्वचा चोळा... अनेकदा पार्लरमध्ये गेल्यावर आपला नंबर येईपर्यंत वेटिंग करावं लागतं. या वेटिंग पिरेडमधे तुम्हाला ही कृती करता येईल. तेल किंवा माॅईश्चरायझर असं काहीही लावू नका. फक्त बोटांच्या टोकांनी त्या भागाची मसाज करा. मसाज केल्याने तेथील त्वचा गरम होईल. त्वचेतले अतिरिक्त तेल निघून जाईल. हेअर फॉलिकल्स मोकळे होतील. मुळापाशी चोळल्याने केस जरा लूज होतील आणि तुलनेने केस निघून येण्यास कमी वेळ लागेल.
२. बर्फ चोळा..
पार्लरला जाण्यापुर्वी तुमच्या भुवयांभोवती ३ ते ४ मिनिटे बर्फ फिरवा. बर्फाच्या गारठ्याने तो भाग जरा जड पडल्यासारखा होईल. त्यामुळे वेदना कमी होतील आणि झटपट आयब्रोज करता येईल.
३. गरम पाण्याने आंघोळ
आयब्रोज करायला जाणार असाल, तर पार्लरला जाण्याआधी गरम पाण्याने आंघोळ करा. आंघोळ केल्याने शरीरात उब निर्माण होते. तसेच गरम, कढत पाण्यामुळे त्वचा ताजीतवानी, फ्रेश झालेली असते. तोव हेअर फॉलिकल्स खुले झालेले असतात. त्यामुळे अशा त्वचेवर आयब्रोज केल्यानंतर वेदना नक्कीच कमी होतात आणि केस मुळांपासून झटपट मोकळे होतात.