केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं.(Fast Hair Growth tips) केसांना पोषण मिळावे यासाठी आहारात पौष्टीक पदार्थांचा समावेश करायला हवा.(kes vadhavnyasathi upay in marathi) कारण वेळेवर न जेवण, पोषक घटकांचा अभाव यामुळे केस मोठ्या प्रमाणात गळू लागतात. (Foods For Hair Growth) शारीरिक आरोग्य चांगले ठेवणं त्वचा आणि केसांची साठी उत्तम ठरते. (Best Food for Hair Growth)
केसांचे गळणं थांबवण्यासाठी तुम्ही आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करू शकता. पौष्टीक पदार्थ खाल्ल्याने केसांना फाटे फुटणं, केस कोरडे होणं या समस्या उद्भवत नाही. आल्याचे पाणी, आल्याचे पाणी, रोज प्यायल्याने शरीराला हेल्दी ठेवू शकता. आल्यात मध मिसळून प्यायल्याने केस नैसर्गिकरित्या काळे राहतील. (What to eat for hair growth naturally)
१) आलं
नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिनच्या रिपोर्टनुसार उंदरांवर केलेल्या एका संशोधनात केसांच्या वाढीसाठी आलं प्रभावी असल्याचे दिसून आले. आलं एक उत्तम हर्ब ज्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. आल्याचा चहा, आल्याचे पाणी रोज प्यायल्याने शरीर हेल्दी ठेवता येते. आल्यात मध मिसळून प्यायल्याने तुम्ही काळेभोर-लांब केस मिळवू शकता.
कपाळावरचे केस जास्तच पांढरे दिसून येतात? रोज ५ पदार्थ खा, डाय न लावता काळेभोर होतील केस
२) आवळा
आवळ्याला एक सुपरफूड असे म्हटले जाते. आवळ्याचे सेवन केल्याने केसांच्या अनेक समस्या टाळता येतात. आवळा केसांना काळे करण्यासाठी, केस गळणं रोखण्यासाठी उत्तम ठरतो. आवळ्याचा हेअर पॅकही तुम्ही केसांना लावू शकता. मेडिकल न्यूज टु डे नुसार आवळ्यामुळे केस गळणं थांबवण्याबरोबरच कोंडा होणं, कोरडा स्काल्प, फंगल इन्फेक्शनचा बचाव होतो. केसांचा नैसर्गिक रंगही टिकून राहतो.
कमी वयातच पांढरे केस उगवू लागले? आठवड्यातून एकदा 'हे' घरगुती टॉनिक लावा, काळे होतील केस
३) गाजर
गाजर व्हिटामीन सी चा एक उत्तम स्त्रोत आहे. गाजरात व्हिटामीन ए आणि व्हिटामीन ई यांसारखे पोषक तत्व असतात. रोज गाजराचा ज्यूस प्यायल्याने केस गळण्याचा त्रास होत नाही आणि केसांची मूळं मजबूत होतात.
४) अश्वगंधा
अश्वगंधा आरोग्यासाठी उत्तम मानला जातो. रोज अश्वगंधा पावडरचे सेवन केल्याने केस पांढरे होण्याची समस्या टाळता येते. रोज अश्वगंधा पावडर दूधाबरोबर मिसळून प्यायल्याने केस काळेभोर राहण्यास मदत होते.
५) ड्रायफ्रुट्स
केसांची लांबी आणि गुणवत्ता सुधारायची असेल तर तुम्ही बदाम, काजू, अक्रोड आणि तुमच्या आवडत्या पदार्थांचा आहारात समावेश करू सकता. यात बायोटीन म्हणजेच व्हिटामीन बी-७ असते. जे केसांना लांब आणि दाट बनवण्यास मदत करतात. नट्स हार्ट डिसीज आणि शरीरात सूज तयार होण्याचा धोका कमी करतात.