Lokmat Sakhi >Beauty > केस गळणं वाढलंय, केसांची वाढच होत नाही? ४ पदार्थ खा; जाड, काळेभोर केस राहतील कायम

केस गळणं वाढलंय, केसांची वाढच होत नाही? ४ पदार्थ खा; जाड, काळेभोर केस राहतील कायम

Food For Hair Growth Faster : केसांना आतून निरोगी आणि मजबूत बनवण्यासाठी पौष्टिकतेने भरपूर आहार घ्यावा. केसांच्या वाढीसाठी पोषक घटकांपैकी प्रथिने अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 07:39 AM2022-06-12T07:39:58+5:302022-06-12T07:44:41+5:30

Food For Hair Growth Faster : केसांना आतून निरोगी आणि मजबूत बनवण्यासाठी पौष्टिकतेने भरपूर आहार घ्यावा. केसांच्या वाढीसाठी पोषक घटकांपैकी प्रथिने अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.

Food For Hair Growth Faster : Dermatologist shares best foods for healthy and strong hair | केस गळणं वाढलंय, केसांची वाढच होत नाही? ४ पदार्थ खा; जाड, काळेभोर केस राहतील कायम

केस गळणं वाढलंय, केसांची वाढच होत नाही? ४ पदार्थ खा; जाड, काळेभोर केस राहतील कायम

जेव्हा तुम्ही आरोग्याशी संबंधित समस्यांमधून जात असता तेव्हा केस झपाट्याने गळू लागतात. याशिवाय अशी अनेक कारणे आहेत, ज्यामुळे केसांशी संबंधित समस्या निर्माण होतात. (Hair Care Tips) तथापि, केस आणि त्वचा अशा दोन गोष्टी आहेत, ज्याची लोक  जास्त काळजी घेतात. (How can I grow my hair faster naturally) केसांची केवळ बाहेरून काळजी घेणे पुरेसे नाही, तर त्यासोबतच आतूनही काळजी घेणे आवश्यक आहे. (Dermatologist shares best foods for healthy and strong hair)

केसांना आतून निरोगी आणि मजबूत बनवण्यासाठी पौष्टिकतेने भरपूर आहार घ्यावा. केसांच्या वाढीसाठी पोषक घटकांपैकी प्रथिने अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. शरीरातील जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता पूर्ण करून केसांना आतून निरोगी बनवता येते. (Food For Hair Growth Faster)

त्वचारोगतज्ज्ञ अनिका गोयल यांनी  इंस्टाग्राम अकाउंटवर निरोगी केसांसाठी सर्वोत्तम खाद्यपदार्थ सांगितले आहेत. या गोष्टींचा आहारात समावेश करून तुम्ही तुमचे केस निरोगी बनवू शकता. जर तुम्ही केसांच्या समस्येतून जात असाल तर या गोष्टींचे सेवन नक्की करा. (Which food makes hair grow faster)

नट्स

केवळ बियाच नाही तर नट देखील केस निरोगी ठेवण्यास मदत करतात. नट्सचे किती प्रमाणात सेवन करावे याबद्दल आपल्या तज्ज्ञाशी सल्लामसलत करण्यास विसरू नका. अनेक वेळा जास्त सेवन केल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम दिसून येतो. वास्तविक, यामध्ये झिंक मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे केस मजबूत होतात.

राजमा

स्वादीष्ट चवीने समृद्ध असलेला राजमा आरोग्यासोबतच केसांसाठीही खूप फायदेशीर मानला जातो. वास्तविक, राजमामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे केस मजबूत करण्याचे काम करते. व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त, त्यात फॉलिक ऍसिड, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि प्रथिने यांसारखे पोषक घटक देखील असतात.

फळं आणि भाज्या

मजबूत केसांसाठी फळे आणि भाज्या इतर घटकांप्रमाणेच महत्त्वाच्या आहेत. तज्ज्ञांच्या मते आहारात बीटरूट, पालक आणि बेरी यांचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या पोषक तत्वांनी परिपूर्ण आहेत, ज्यामुळे तुमच्या केसांनाही फायदा होईल.

ओट्स

केसांना बाहेरूनच नव्हे तर आतूनही निरोगी बनवण्यासाठी ओट्स हा उत्तम घटक असू शकतो. अनेक महिला त्याचा हेअर मास्क केसांवर लावतात. त्याचा आहारात समावेश केल्यास केसांना आतून मजबूत बनवता येते. यामध्ये असलेले प्रोटीन, थायमिन, नियासिन, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन बी12, फॉस्फरस, रिबोफ्लेविन, फोलेट यांसारखे पोषक घटक केसांच्या समस्यांपासून आराम देतात.

Web Title: Food For Hair Growth Faster : Dermatologist shares best foods for healthy and strong hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.