असे बरेच लोक आहे ज्यांना वेळेआधीच केस पांढरे होण्याची समस्या उद्भवते. केसांची व्यवस्थित देखभाल न केल्यास न केल्यास किंवा हॉर्मोनल बदलांमुळे, खाण्यापिण्यातील पोषक तत्वांच्या अभावामुळे केस वेळेआधीच पांढरे होऊ लागतात. पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी आणि केसांना भरपूर पोषक तत्व मिळण्यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. (Premature Grey Hair) न्युट्रिशनिस्ट सिमरन चोपडा यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून या पदार्थांबद्दल अधिक माहिती दिली आहे. (Foods For Hair Growth And Premature Grey Hairs)
ज्यात जेनेटिक्स, थायरॉईड आणि पोषक तत्वांची कमतरता उद्भवते. अशा काही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास केस पांढरे होण्याची समस्या उद्भवत नाही. न्युट्रिशनिस्ट सिमरन चोपडा यांच्या म्हणण्यानुसार व्हिटामीन डी, व्हिटामीन बी-१२, आयर्न, थायरॉई़ड फंक्शनचं याचे भरपूर प्रमाणात सेवन करा ज्यामुळे पोषक तत्व मिळतात. जेनेटिक्समुळे केस पांढरे होण्याची समस्या उद्भवते. (Foods For Hair Growth And Premature Grey Hairs Suggested By Nutritionist)
क्लिव्हलॅण्ड क्लिनिकच्या रिपोर्टनुसार दुग्धजन्य पदार्थ, नट्स, सिड्स, लॅक्टोज फ्री डेअरी प्रोडक्ट्सचा आहारात समावेश करा. कॅल्शियम फोर्टिफाईड फूड्स, सोया मिल्क या पदार्थांचा आहारात समावेश करा. हिरव्या भाज्या, ब्रोक्रोली कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहेत. फोर्टिफआईड ऑरेंज ज्युसमध्ये एक ग्लास दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असते.
1) आयर्न
आयर्नच्या सेवनाने प्रिमॅच्युअर ग्रे हेअर्सची समस्या दूर होण्यास मदत होते. पालक, राजमा, छोले, टोफू, मनुके आणि लाल मीट आयर्नचा चांगला स्त्रोत आहेत.
कंबरेत वेदना-गुडघे दुखतात; १ चमचा 'या' लाल बिया खा, कॅल्शियम खच्चून मिळेल-हाडं बळकट
2) जिंक
भोपळ्याच्या बीया, तिळ, छोले, बदाम, काजू, दूधापासून तयार झालेल पदार्थ सीफूड शरीराला जिंक मोठ्या प्रमाणात मिळते.
3) मॅग्नेशियम
शरीराला चांगल्या प्रमाणात मॅग्नेशियम हे भोपळ्याच्या बीयांमधून मिळते. सुर्यफुलाच्या बीया, बदाम, काजू, पालक, डार्क चॉकलेट, एवोकॅडो आणि राजमा खाऊ शकता.
टपरीसारखा फक्कड-दाट चहा करा घरीच; वापरा ‘हा’ खास चहा मसाला, पावसाळ्यासाठी खास चहा
4) कॉपर
तिळ, सोयबीन, मशरूम, आलू, पालक, केल कॉपरचा चांगला स्त्रोत आहे. न्युट्रिशनिस्टच्या रिपोर्टनुसार या पदार्थांचा बॅलेंन्स डाएटचा आहारात समावेश करा. बॅलेंन्स डाएटमध्ये भाज्या, फळं, लीन प्रोटीन, हेल्दी फॅट्सचा समावेश करू शकता.