ताण-तणाव, अनुवांशिका कारणं, पोषणाची कमतरता अशा अनेक कारणांमुळे केसांची वाढ व्यवस्थित होत नाही. खाण्यापिण्यातील अनियमिता, पोषणाचा अभाव यामुळे केस व्यवस्थित वाढत नाही. अनेकांना पातळ-ड्राय केस अजिबात आवडत नाहीत. केसांना पोषण मिळाल्यास केसांचं गळणं थांबवता येऊ शकतं. (Which food is good for hair growth)
हेल्दी, लांब केसांसाठी शॅम्पू आणि कंडीशनर लावण्याबरोबर आपण काय खातो याकडे लक्ष देणंही तितकंच महत्वाचं असतं. केसांच्या चांगल्या वाढीसाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करायचा ते पाहूया. केसांच्या वाढीसाठी प्रोटीन्स, ओमेगा-३ फॅटि एसिड्स, बी-कॉम्पलेक्स व्हिटामीन, आयर्नची आवश्यकता असते. (The Best Foods To Grow Thick And Healthy Hair)
नट्स
शेंगदाणे, काजू, बदाम आणि अक्रोड नट्स प्रोटीन्स, हेल्दी फॅट, बायोटीन आणि जिंक यांसारखे महान स्त्रोत असतात. हे स्काल्पसाठी फायदेशीर ठरतात. केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. ज्यामुळे केस गळणं थांबतं.
चिया सिड्स
चिया सिड्स पोषणाचा एक पॉवर हाऊस आहे. यात ओमेगा-३ फॅटी एसिड्स असतात. यात प्रोटीन्ससुद्धा असतात. ज्यात सोयाबीनच्या तुलनेत २० टक्के प्रोटीन्स जास्त असतात. यामुळे स्काल्प हेल्दी राहतो आणि केस दाट, सुंदर होतात.
रताळे
रताळ्यांमध्ये बीटा कॅरोटीन आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे केस मजबूत दाट होण्यास मदत होते.
गाजर
गाजरातील व्हिटामीन ई नवे केस उगवण्यासाठी, केसांना काळे-दाट बनवण्यासाठी फायदेशीर ठरतात. यातील व्हिटामीन सी मुळे रक्तप्रवाह व्यवस्थित होतो. परिणामी केस गळण्याची समस्या उद्भवत नाही.
बदाम
बदामात आयर्न, कॉपर, फॉस्फरस,व्हिटामी बी-१ आणि प्रोटीन्स असतात. बदामाच्या तेलात २ ते ३ चमचे दूध मिसळून केसांना लावल्याने त्वचेसह केसांची मूळंही मजबूत राहतात.
गणपतीत चेहऱ्यावर ग्लो हवाय? १ टोमॅटो घ्या-घरीच करा टोमॅटो फेशियल, टॅनिंग दूर-उजळेल चेहरा
केळी
केळ्यात साखर, फायबर्स, थायमिन आणि फॉलिक एसिड असते. यात व्हिटामी ए आणि बी असते. नियमित केळी खाल्ल्याने केस मजबूत आणि दाट राहतात.
ओट्स
ओट्समध्ये फायबर्स व्यतिरिक्त जिंक, ओमेगा ५ फॅटी एसिड्स असतात. जे केसांच्या विकासासाठी गरजेचे असतात. रोज सकाळी नाश्त्याला ओट्स खाल्ल्याने शरीर निरोगी राहते.
डाळी
तूर, मूग, उडीद आणि मसूर डाळ या डाळींच्या सेवनाने केस मजबूत राहतात. म्हणूनच रोजच्या आहारात यापैकी कोणत्याही एका डाळीचा समावेश करा.