Join us  

८ पदार्थ नियमित खा, कुठलीही क्रीम न लावता-मेकअप न करताही कायम दिसाल सुंदर आणि तरुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2022 2:26 PM

कितीही चांगल्या ब्रॅण्डची सौंदर्य उत्पादनं वापरली तरी तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी फक्त हेच महत्वाचं नाही. यासाठी आहारात जाणिवपूर्वक कोलॅजनयुक्त (collagen foods) ॲण्टि एजिंग फूडसचा (anti aging foods) समावेश करायला हवा. आपल्या आहारात ॲण्टिऑक्सिडण्टस, आरोग्यदायी फॅटस, पाणी आणि आवश्यक पोषक घटक असल्यास त्याचा चांगला परिणाम त्वचेवर (for healthy skin) होतो.

ठळक मुद्देपपईमध्ये असलेल्या ॲण्टिऑक्सिडण्टस, जीवनसत्वं आणि खनिजांमुळे त्वचेची लवचिकता वाढते. चेहेऱ्यावरील सुरकुत्या निघून जातात.पालकाच्या भाजीतील क जीवनसत्वामुळे कोलॅजनची निर्मिती वाढते.रताळ्यातील गुणधर्मांचा उपयोग त्वचा लवचिक होण्यासाठी होतो. 

चेहेरा तरुण दिसण्यासाठी बाजारात विविध लोशन्स, क्रिम्स आहेत. कितीही चांगल्या ब्रॅण्डची सौंदर्य उत्पादनं वापरली तरी  तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी फक्त हेच महत्वाचं नाही. यासाठी आहारात जाणिवपूर्वक कोलॅजनयुक्त (collagen foods)  ॲण्टि एजिंग फूडसचा  (anti aging foods) समावेश करायला हवा. आपल्या आहारात ॲण्टिऑक्सिडण्टस, आरोग्यदायी फॅटस, पाणी आणि आवश्यक पोषक घटक असल्यास त्याचा चांगला परिणाम त्वचेवर (anti aging foods benefits to skin)  होतो.  आपल्या शरीराचं तंत्र आतून बिघडलेललं असल्यास चेहेऱ्यावर त्याचा वाईट परिणाम दिसतोच. शरीराचं तंत्र बिघडलेलं असल्यास चेहेरा खराब होतो, काळपट पडतो , चेहेऱ्यावर वयाच्या खूणा दिसू लागतात. चेहेरा सुंदर आणि तरुण (for beautiful and healthy skin)  दिसण्यासाठी म्हणूनच आहाराला महत्व आहे. आहारात 8 गोष्टींचा जाणीवपूर्वक समावेश केल्यास चेहेरा तरुण ( for youthful skin)  आणि सुंदर दिसतो. 

Image: Google

1. जलकुंभी

बारीक गोल पानांची जलकुंभी या पालेभाजीत त्वचेस उपयुक्त पाण्याचा भरपूर समावेश असतो. जलकुंभीत कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नीज, फाॅस्फरस, अ, क, के, ब1 आणि ब2 ही जीवनसत्वं असतात.  जलकुंभीतील गुणधर्म त्वचेच्या अंतर्गत ॲण्टिस्पेप्टिक म्हणून काम करतात. त्वचेखालील रक्तप्रवाह वाढतो तसेच पेशींना खनिजांचा पुरवठा होतो. जलकुंभीमुळे त्वचेला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. जलकुंभीतील अ, क जीवनसत्वं आणि ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे त्वचेचं मुक्त मुलकांपासून ( फ्री रॅडिकल्स) संरक्षण होतं. यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडत नाही.  जलकुंभीत असलेल्या आयोडिन या घटकामुळे थायराॅइड समस्येतही ती फायदेशीर ठरते. जलकुंभीचा वापर कच्च्या स्वरुपात सॅलेडमध्ये केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते तसेच पचनक्रियाही सुधारते. 

Image: Google

2. लाल सिमला मिरची

लाल सिमला मिरचीत ॲण्टिऑक्सिडण्ट्सचं प्रमाण भरपूर असतं. यात क जीवनसत्वाचं प्रमाण भरपूर असल्यानं कोलॅजनची निर्मिती वाढण्यास मदत होते.  लाल सिमला मिरचीतील कॅरोटेनाॅइडस या ॲण्टिऑक्सिडण्टमुळे त्वचेचं सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण होतं. तसेच लाल सिमला मिरची दाह आणि सूजविरोधी गुणधर्म असल्यानं चेहेऱ्यावर सूज येत नाही.  लाल सिमला मिरचीचा समावेश कच्च्या स्वरुपात सॅलेडमध्ये करता येतो तसेच केवळ परतलेली भाजीही छान लागते. 

Image: Google

3. पपई 

पपईमध्ये असलेल्या ॲण्टिऑक्सिडण्टस, जीवनसत्वं आणि खनिजांमुळे त्वचेची लवचिकता वाढते. चेहेऱ्यावरील सुरकुत्या निघून जातात.  पपईमध्ये अ,क, के, ब आणि ई हे जीवनसत्वं, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फाॅस्फरस ही खनिजं असतात. पपईमधे भरपूर प्रमाणात असलेल्या ॲण्टिऑक्सिडण्ट्समुळे त्वचेचं मुक्त मुलकांपासून संरक्षण होतं. एजिंगची प्रक्रिया दूर लोटली जाते. पपईमध्ये पॅपेन नावाचं विकर असतं जे त्वचेचं सुरकुत्या पडण्यापासून संरक्षण करतं. पपई नियमित खाल्ल्यानं मृत त्वचा निघून जाते. त्वचेवर चमक येते. पपईवर लिंबू पिळून खाल्यास पपई फायदेशीर ठरते. पपई खाण्यासोबतच ती चेहेऱ्यालाही लावायला हवी. 

Image: Google

4. ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये सूज आणि दाहविरोधी गुणधर्म असतात. क आणि के जीवनसत्वं, ॲण्टिऑक्सिडण्टस , फायबर, फोलेट, ल्युटिन, कॅल्शियम हे घटकही असतात. ब्रोकोलीमधील क जीवनसत्वामुळे कोलॅजन या त्वचेसाठी महत्वाच्या असलेल्या प्रथिनांची निर्मिती होण्यास चालना मिळते. त्वचेची लवचिकता वाढते. ब्रोकोली कच्च्या स्वरुपात सॅलेडमध्ये किंवा थोडी शिजवून  परतलेल्या भाजीच्या स्वरुपात खाता येते. 

Image: Google

5. पालक

पालकामध्ये पाण्याचं प्रमाण आणि ॲण्टिऑक्सिडण्ट्सचं प्रमाण जास्त असतं. पालकामधील घटकांमुळे शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो. पालकामध्ये अ. क, ई आणि के ही जीवनसत्वं, मॅग्नेशियम, लोह, ल्युटेन हे महत्वाचे घटक असतात. पालकाच्या भाजीतील क जीवनसत्वामुळे कोलॅजनची निर्मिती वाढते. यामुळे त्वचा घट्ट आणि मऊ होते. पालकाच्या भाजीतील अ जीवनसत्वामुळे केसही मजबूत होतात. के जीवनसत्वामुळे पेशींचा दाह टळतो. स्मूदी, सॅलेड, पातळ/ कोरडी भाजी या स्वरुपात पालक खाता येतो. 

Image: Google

6. सुकामेवा

सुकामेव्यात त्वचेसाठी विशेषत: बदाम खाण्याला महत्व आहे. बदामात त्वचेतील पेशी दुरुस्त करणारे, त्वचेला पुरेशी आर्द्रता पुरवणारे आणि त्वचेचं सूर्याच्या घातक किरणांपासून संरक्षण करणारे ई जीवनसत्वं जास्त असत. तर आक्रोडमध्ये सूज आणि दाह विरोधी घटक, ओमेगा 3 फॅटी ॲसिड यांचं प्रमाण जास्त असतं. त्याचा उपयोग पेशी मजबूत होण्यासाठी, सूर्याच्या अति नील किरणांपासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी, त्वचेतील नैसर्गिक तेलाचा समतोल साधून त्वचेवर चमक येण्यासाठी होतो. 

Image: Google

7. रताळी

नारिंगी रंगाच्या रताळ्यात बीटा केरोटीन हे ॲंण्टिऑक्सिडण्ट भरपूर प्रमाणात असतं. या ॲण्टिऑक्सिडण्टचं रुपांतर अ जीवनसत्वात होतं. याचा उपयोग त्वचा लवचिक होण्यासाठी, त्वचेतील पेशींची निर्मिती वाढण्यासाठी आणि तरूण, मऊ, उजळ त्वचा होण्यासाठी होतो.  रताळ्यात क आणि ई जीवनसत्वं असतात. याचा उपयोग त्वचेचं मुक्त मुलकांपासून संरक्षण करण्यासाठी होतो. 

Image: Google

8. डाळिंब

डाळिंब हे औषधी फळ म्हणून ओळखलं जातं. डाळिंबातील क जीवनसत्व आणि ॲण्टिऑक्सिडण्ट्समुळे शरीर आणि त्वचेचं मुक्त मुलकांपासून संरक्षण होतं. शरीरावरील सूज कमी होते. डाळिंबातील पुनिकॅलॅजिन्समुळे त्वचेतील कोलॅजनचं संरक्षण होतं. एजिंगची प्रक्रिया पुढे ढकलली जाते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीआहार योजना