Skin Care Tips: त्वचेची नियमितपणे काळजी घ्याल तरच त्वचा सुंदर दिसेल. जर त्वचेची योग्य ती काळजी घेतली गेली नाही तर त्वचा खराब होऊ लागते आणि तुम्ही कमी वयातच म्हातारे दिसू लागता. त्वचेवर काळे डाग आणि सुरकुत्या दिसू लागतात. अशात केमिकल्स असलेल्या प्रोडक्ट्सऐवजी काही घरगुती उपाय खूप फायदेशीर ठरतात. चाळीशीतही तुम्हाला २० वर्षाचं दिसायचं असेल तर बटाटे तुमच्यासाठी बेस्ट उपाय ठरू शकतात. बटाट्याचा रस तुमच्या त्वचेवर रंगत आणण्यासाठी मदत करतो. फक्त बटाट्याच्या रसात काही गोष्टी मिक्स कराव्या लागतील. यानंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच रंगत बघायला मिळेल.
बटाट्याच्या रसात तांदळाचं पीठ
बटाट्याच्या रसासोबतच तांदळाचं पीठ सुद्धा त्वचेसाठी खूप फायदेशीर असतं. यासाठी एक चमचा बटाट्याचा रस घ्या. त्यात २ चमचे तांदळाचं पीठ टाका आणि नंतर त्यात अर्धा चमचा मध टाका. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा.
ही पेस्ट चेहऱ्यावर चांगल्याप्रकारे लावा. या उपायानं चेहऱ्याची गेलेली रंगत परत येईल. आठवड्यातून दोनदा तुम्ही हा उपाय करू शकता. दोन आठवड्यातच तुम्हाला या उपायाचा प्रभाव दिसू लागेल.
बटाट्याच्या रसाचे फायदे
बटाट्यामध्ये पोटॅशिअम, अॅंटी-ऑक्सिडेंट आणि अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात, जे चेहरा साफ करण्यास मदत करतात. या रसानं चेहरा आणखी उजळतो आणि फ्रेश दिसतो. त्वचा साफ करण्यासाठी बटाट्याचा रस फायदेशीर ठरतो.
तांदळाच्या पिठाचे फायदे
तांदळाचं पीठ त्वचेसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. यात व्हिटॅमिन बी, ई आणि मिनरल्स असतात. त्यासोबतच तांदळाच्या पिठात अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. या सगळ्याच पोषक तत्वांमुळे त्वचेवरील डाग कमी करण्यास मदत मिळते आणि चेहऱ्यावर ग्लो येतो.
मधाचे फायदे
मध शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. यातील अनेक औषधी गुणांमुळे मधाला आयुर्वेदातही खूप महत्व आहे. जर याचा वापर त्वचेवर केला तर त्वचा उजळ होण्यास आणि साफ होण्यास मदत मिळते. मधात अॅंटी-ऑक्सिडेंट्स, अॅंटी-बॅक्टेरिअल आणि ह्ययूमॅक्टंट गुण असतात, जे त्वचेचा फ्री रॅडिकल्सपासून बचाव करतात. तसेच यानं चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.
इतर काही उपाय
- त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी आणि हायड्रेट ठेवणंही तेवढंच गरजेचं असतं. त्यामुळे रोज कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्यावं. सोबतच बाहेरचे तेलकट पदार्थ टाळावेत.
- व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई असलेली फळं, भाज्या आणि ड्राय फ्रूट्स खावेत. यानंही त्वचा निरोगी आणि चांगली राहते.
- घरातून बाहेर जाताना नेहमीच त्वचेवर सनस्क्रीन लावावं. सनस्क्रीनचं सूर्याच्या यूव्ही किरणांपासून बचाव होतो.
- त्वचे हेल्दी ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणंही तेवढंच महत्वाचं आहे. जेव्हा झोप पूर्ण होते, तेव्हा चेहऱ्यावर ग्लो दिसतो.
- त्वचेवर घरगुती उपाय करण्यासोबतच एक्सरसाईज करणंही गरजेचं असतं. रोज प्राणायाम आणि फेशिअल एक्सरसाईज करा.
- तणाव जेवढा कमी कराल त्वचेवर तेवढा जास्त प्रभाव पडतो. तणाव कमी कराल तर त्वचेवर त्याचा फरक दिसून येतो.