Join us  

साबुदाणा फेसपॅक वापरून पाहा, मिळेल इन्स्टंट ग्लो.. साबुदाण्यासारखाच लखलखीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2023 4:51 PM

For Radiant Glow On Your Face Try Homemade Sabudana Face Pack स्किनवर ग्लो हवाय? साबुदाण्याचा बनवा 'असा' फेसपॅक, चेहऱ्यावर येईल नवी चमक

उपवास असल्यावर आपण साबुदाणा, भगर, स्वीट पोटॅटो खातो. साबुदाणा हा पदार्थ अनेकांना आवडतो. साबुदाण्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात. जसे की, साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडा आणि साबुदाण्याची खीर. पण पदार्थ बनवण्याव्यतिरिक्त, आपण साबुदाण्याचा वापर त्वचेची चमक वाढवण्यासाठी कधी केला आहे का?

स्किनची नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी साबुदाण्याचा वापर केला जाऊ शकतो. आपण साबुदाण्यापासून फेसपॅक बनवू शकता. रोजच्या धकाधकीच्या जीवनात धूळ - मातीमुळे चेहरा खूप खराब होतो. या समस्येपासून सुटका हवी असल्यास या फेसपॅकचा वापर करा. यामुळे चेहऱ्यावरील डागांपासून सुटका तर मिळेलच, यासह स्किनवर नैसर्गिक चमकही येईल(For Radiant Glow On Your Face Try Homemade Sabudana Face Pack).

साबुदाणा फेसपॅक बनवण्यासाठी लागणारं साहित्य

एक मोठ चमचा साबुदाणा

एक टेबलस्पून मुलतानी माती 

एक चमचा बेसन 

गुलाब जल

केस धुतल्यानंतर ४ गोष्टी करता? म्हणूनच तुमचे केस फार गळतात..

लिंबाचा रस 

अशा पद्धतीने बनवा साबूदाणा फेसपॅक

सर्वप्रथम, पॅनमध्ये साबुदाणा आणि लिंबाचा रस मिक्स करा, हे मिश्रण मंद आचेवर ढवळत राहा. आता गॅस बंद करून, मिश्रण थंड होण्यासाठी ठेवा. मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरमधून वाटून घ्या. जर आपली त्वचा तेलकट असेल तर त्या मिश्रणात मुलतानी माती घालून मिक्स करा. अथवा बेसन घाला. आता त्यात गुलाबपाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनी चेहरा धुवा. चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.

मेकअप न करताही सेलिब्रिटींसारखं सुंदर दिसायचंय? ५ गोष्टी- देतील तुम्हाला सुंदर ग्लो

त्वचेसाठी साबुदाण्याचे फायदे

साबुदाणामध्ये अँटिऑक्सिडेंट आढळते, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. साबुदाणा फेसपॅक लावल्याने चेहऱ्यावरील मुरुम दूर होतील. यासह त्वचेची चमकही वाढते.

त्वचा एक्सफोलिएट होते

साबुदाणा फेसपॅक लावल्याने चेहरा स्वच्छ होतो. त्वचेची घाण काढण्यासाठी उपयुक्त आहे. साबुदाणा दुधात भिजवून चेहऱ्याला लावल्याने स्किन ग्लो करते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी