Join us  

उन्हामुळे कपाळ, मान टॅन झालीये? ५ घरगती उपाय, पार्लरला न जाताच स्किन दिसेल ग्लोईंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2023 3:52 PM

Forehead tan removal Tips : उन्हाळ्यात चेहऱ्यावर टॅनिंग जाणवणं खूपच कॉमन आहे पण  २ ते ३ आठवडे हे टॅनिंग टिकून राहतं. 

उन्हाळ्याच्या दिवसात सनस्क्रीन लावल्यानंतर चेहरा काळपट दिसतो.  उन्हाचे एक्सपोजर, हार्मोनल बजल, शरीरातील पोषक तत्वांची कमरतता यामुळे मेलेनिन वाढते  त्यामुळे स्किन टॅन होते.(Sun Tanning)  चेहऱ्यावरचा रंग उजळवण्यासाठी फेशियल, ब्लिच, क्लिनअप किंवा डि टॅन केले जाते पण हवातसा बदल चेहऱ्यामध्ये दिसत नाही. (Forehead Tanning) उन्हाळ्यात चेहऱ्यावर टॅनिंग जाणवणं खूपच कॉमन आहे पण  २ ते ३ आठवडे हे टॅनिंग टिकून राहतं.  चेहऱ्याचं टॅनिंग दूर करण्यासाठी  काही सोपे हॅक्स तुम्हाला उपयोगी ठरू शकतात.

दूध आणि हळद (Highly effective home remedies to remove Sun tan)

कपाळाचा काळेपणा दूर करण्यासाठी दोन चमचे कच्च्या दुधात चिमूटभर हळद मिसळा आणि त्याची पातळ पेस्ट कपाळावर १० ते १५ मिनिटे लावा. त्यामुळे कपाळावरील काळेपणा दूर होऊ लागतो.

रात्री हा उपाय करा

रात्रीच्यावेळी तुमची त्वचा रिपेअर मोडमध्ये असते, त्यामुळे कपाळावरील काळेपणा आणि सनबर्न दूर करण्यासाठी, रात्री झोपण्यापूर्वी कच्च्या दुधात गुलाबजलाचे काही थेंब मिसळा आणि त्यात कापूस बुडवून घ्या आणि कपाळावर लावा आणि रात्रभर तसेच राहू द्या. या उपायानं कपाळाचा काळपटपणा दूर होण्यास मदत होईल.

लिंबाचा रस आणि मध

फोरहेडचा काळेपणा दूर करण्यासाठी अर्धा चमचा लिंबाचा रस एक चमचा मधात मिसळून त्याची बारीक पेस्ट तयार करून कपाळावर लावा. ते त्वचा एकसमान करते आणि सनबर्न दूर करते.

काकडीचा रस

कपाळावर टॅनिंग झालं असेल तर सनस्क्रीन लावा. सनस्क्रीनमुळे त्वचा चमकदार दिसण्यास मदत होईल. 

बेसनाचा फेसपॅक

टॅनिंग आणि सनबर्न दूर करण्यासाठी बेसन हा एक उत्तम घटक आहे. अशा स्थितीत कपाळावरील काळेपणा दूर करण्यासाठी बेसन आणि कच्च्या दुधाचा पॅक बनवून त्यात चिमूटभर हळद टाकून ही पेस्ट कपाळावर लावा. 

बडीशेप खा

जर तुमच्या कपाळाचा रंग हार्मोनल बदलांमुळे आणि पोट साफ नसल्यामुळे काळा होत असेल तर तुमच्या आहारात बडीशेप समाविष्ट करा. सकाळी उठून एका बडीशेपचे पाणी प्यायल्याने कपाळाचा काळेपणा दूर होतो.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहेल्थ टिप्स