Join us  

गरबा खेळताना खूप घाम येतो-दुर्गंधीही येते घामाची? १ भन्नाट ट्रिक-डिओपेक्षा भारी उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2024 6:28 PM

Perfume hack to smell good all day : Fragrance Hacks to Help Your Perfume Last Longer : कितीही परफ्युम, डिओड्रंट लावले तरीही घामाची दुर्गंधी येते, अशा पद्धतीने लावा डिओड्रंट - टिकेल दीर्घकाळ....

सतत येणारा घाम आणि त्या घामाची दुर्गंधी यामुळे नकोसे वाटते. काहीजणांना इतका घाम येतो की येणाऱ्या दुर्गंधीमुळे कपडे सतत बदलावे लागतात. याचबरोबर घाम आल्यावर तो सतत पुसावा लागतो, शरीराला दुर्गंधी येते. या घामामुळे आपण संपूर्णपणे भिजतो आणि येणाऱ्या दुर्गंधीमुळे आपल्याला काहीवेळा चारचौघात लाजल्यासारखे होते. अशावेळी घामाची दुर्गंधी लपवण्यासाठी आपण डियो, परफ्युम, सेंट, स्प्रे अशा वेगवेगळ्या सुगंधित द्रव्यांचा वापर करतो(Perfume hack to smell good all day).

सध्या नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सगळीकडे साजरा केला जात आहे. नवरात्रीतगरबा खेळून आपल्याला खूप घाम येतो. गरबा खेळताना आपल्याला सतत रुमालाने घाम पुसावा लागतो. गरबा खेळताना घामाच्या धारा लागून कपडे भिजतात. अशा घामाने ओल्या चिंब झालेल्या कपड्यातून घामाची घाणेरडी दुर्गंधी येऊ नये म्हणून आपण आधीच परफ्युम, डियो, डिओड्रंट लावतो. परंतु हे परफ्युम, डियो आपल्या कपड्यांवर कायम टिकून राहत नाही. एका ठराविक वेळेनंतर त्यांचा सुगंध येत नाही. अशावेळी आपण एक सोपी ट्रिक वापरुन या परफ्युम, डिओड्रंटचा सुगंध दीर्घकाळासाठी टिकवून ठेवू शकतो. साधारणता कोणताही परफ्युम, डिओड्रंट लावताना आपण तो कपड्यांवर सगळीकडे स्प्रे करून लावतो. परंतु स्प्रे करण्याच्या या चुकीच्या पद्धतीमुळे परफ्युम, डिओड्रंटचा सुगंध दीर्घकाळासाठी राहत नाही. यासाठीच जर तुम्हाला परफ्युम, डिओड्रंटचा सुगंध दीर्घकाळ टिकवून ठेवायचा असेल तर एका खास ट्रिकचा उपयोग करु शकता. ही ट्रिक नेमकी कोणती ते पाहूयात(Fragrance Hacks to Help Your Perfume Last Longer).

परफ्युम, डिओड्रंट दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी... 

साधारणतः आपण कोणत्याही परफ्युम, सेंट, डिओड्रंटचा वापर करताना तो अंगावर स्प्रे करतो. स्प्रे करताना शक्यतो आपण तो काखेत, मानेवर, हात आणि खांद्यांवर स्प्रे करतो. परंतु याचा सुगंध हा एका ठराविक काळापर्यंतच मर्यादित राहतो. त्यानंतर पुन्हा घाम येऊन घामाची दुर्गंधी येऊ लागते. खरंतर, आपण परफ्युम, डिओड्रंट चुकीच्या पद्धतीने लावतो.

नवरात्र स्पेशल: काळे पडलेले ऑक्सिडाइज्ड दागिने चमकतील नव्यासारखे, घ्या ६ टिप्स- गरब्यासाठी व्हा रेडी...

परफ्युम, डिओड्रंटचा सुगंध दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी एका सोप्या ट्रिकचा वापर आपण करु शकतो. यासाठी  कोणत्याही प्रकारच्या बॉडी लोशनचे २ ते ३ थेंब हातावर घेऊन त्यात परफ्युम, डिओड्रंट स्प्रे करुन घ्या. आता हे हलकेच हातांवर चोळून मिक्स करून घ्यावे.  बॉडी लोशन व परफ्युम, डिओड्रंट एकत्रित मिक्स  करून घ्यावे. त्यानंतर हे आपल्या त्वचेवर लावावे. अशा पद्धतीने जर आपण परफ्युम, डिओड्रंट लावले तर त्याचा सुगंध दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते.

गरबा खेळून घाम येतो - मेकअप पसरू नये म्हणून 'असा ' करा वॉटरप्रूफ मेकअपबेस...

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव २०२४ब्यूटी टिप्सनवरात्रीफॅशनगरबानवरात्री गरबा २०२४