Lokmat Sakhi >Beauty > छोट्या केसांचाही घालता येतो स्टायलिश फ्रेंच रोल! 5 सोप्या टिप्स, उन्हाळ्यात करा चटकन सुंदर हेअरस्टाईल 

छोट्या केसांचाही घालता येतो स्टायलिश फ्रेंच रोल! 5 सोप्या टिप्स, उन्हाळ्यात करा चटकन सुंदर हेअरस्टाईल 

French Bun Hairstyle: तुमचे केस खांद्यापेक्षाही छोटे असतील तरीही तुमच्या केसांचा उत्तम फ्रेंच रोल घालता येतो... हा बघा त्यासाठीच एक खास व्हिडिओ. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2022 06:12 PM2022-05-02T18:12:42+5:302022-05-02T18:51:08+5:30

French Bun Hairstyle: तुमचे केस खांद्यापेक्षाही छोटे असतील तरीही तुमच्या केसांचा उत्तम फ्रेंच रोल घालता येतो... हा बघा त्यासाठीच एक खास व्हिडिओ. 

French bun hairstyle with short hair. How to do French Roll hairstyle with short hair?  | छोट्या केसांचाही घालता येतो स्टायलिश फ्रेंच रोल! 5 सोप्या टिप्स, उन्हाळ्यात करा चटकन सुंदर हेअरस्टाईल 

छोट्या केसांचाही घालता येतो स्टायलिश फ्रेंच रोल! 5 सोप्या टिप्स, उन्हाळ्यात करा चटकन सुंदर हेअरस्टाईल 

Highlightsबघा एक खास व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये लहान केसांचा फ्रेंच बन कसा घालायचा हे सांगितले आहे.

उन्हाळ्यात स्टायलिश लूक देणारी फ्रेंच रोल किंवा फ्रेच बन (French bun) हेअरस्टाईल नेहमीच इन असते. कारण यामध्ये सगळे केस वर बांधले जातात. त्यामुळे गरमी होऊन मानेवर घामघाम होत नाही. शिवाय फ्रेंच बन ही अशी एक हेअरस्टाईल आहे, जिचा लूक अतिशय स्टायलिश असतो. तुम्ही एखाद्या लग्नासाठी, पार्टीसाठी तयार होतानाही फ्रेंच बन घालू शकता किंवा मग अगदी कोणत्या ऑफिशियल मिटिंगसाठी जात असताना फॉर्मल कपड्यांवरही ही हेअरस्टाईल करू शकता.

 

एकंदरीतच काय की कोणत्याही पेहरावावर आणि कोणत्याही प्रसंगी ही हेअरस्टाईल (How to do French Roll hairstyle with short hair?) नक्कीच खास दिसते. खांद्यापेक्षा मोठे, पाठीवर रुळणारे केस असतील तर फ्रेंच रोल अतिशय उत्तमप्रकारे घालता येतो. पण केस जर अगदीच छोटे म्हणजे शोल्डर कट, बॉबकट असतील, तर ही हेअरस्टाईल करणे खूपच अवघड जाते, अशी अनेकांची तक्रार असते. म्हणूनच तर हा बघा एक खास व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये लहान केसांचा फ्रेंच बन कसा घालायचा हे सांगितले आहे. meenu.rpk_offical या इन्स्टाग्राम पेजवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

 

 

छोट्या केसांचा फ्रेंच बन
- यासाठी सगळे केस वर घेऊन मध्यम उंचीवर एक छानसा पोनी घाला.
- आता जिथे तुम्ही रबर लावलं आहे, त्याच्या बरोबर वर आणि एक खाली असे केसांचे दोन भाग करा. 
- तुमचा पोनी उजव्या बाजूला वळवा आणि आपण केसांचे जे दोन भाग केले आहेत, त्यातून आत घाला आणि डाव्या बाजूने बाहेर काढा.
- आता डाव्या बाजुने बाहेर आलेले केस पुन्हा बाहेरून वळवा आणि उजव्या बाजूकडे आणा आणि तिथून पुन्हा आता घाला.
- हे केस आता इथेच एक आडवी पिन लावून पिनअप करून टाका. 
- केसांचा आकर्षक स्टायलिश फ्रेंच बन झाला तयार. 

 

Web Title: French bun hairstyle with short hair. How to do French Roll hairstyle with short hair? 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.