Lokmat Sakhi >Beauty > केस गळतीची समस्या वारंवार उद्भवते? तेल लावण्याची पद्धत चुकते? योग्य पद्धत करेल मदत

केस गळतीची समस्या वारंवार उद्भवते? तेल लावण्याची पद्धत चुकते? योग्य पद्धत करेल मदत

Method of Hair Oiling will help you out from Hair loss हिवाळ्यात केस गळतीची समस्या सामान्य आहे, मात्र केसांची निगा राखण्यासाठी केसांवर तेल लावणे महत्वाचे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2023 04:03 PM2023-01-19T16:03:00+5:302023-01-19T16:04:18+5:30

Method of Hair Oiling will help you out from Hair loss हिवाळ्यात केस गळतीची समस्या सामान्य आहे, मात्र केसांची निगा राखण्यासाठी केसांवर तेल लावणे महत्वाचे..

Frequent hair loss problem? Wrong method of oiling? The right method will help | केस गळतीची समस्या वारंवार उद्भवते? तेल लावण्याची पद्धत चुकते? योग्य पद्धत करेल मदत

केस गळतीची समस्या वारंवार उद्भवते? तेल लावण्याची पद्धत चुकते? योग्य पद्धत करेल मदत

हिवाळ्यात केस आणि त्वचेच्या बाबतीत समस्या उद्भवणे सामान्य आहे. मात्र, त्यांची योग्यरीत्या काळजी न घेतल्यास त्वचा आणि केसांना हानी पोहचते. हिवाळ्यात केस अधिक प्रमाणावर गळतात. महिलावर्ग केस कोरडे पडणे, फाटे फुटणे अशा समस्येपासून हैराण होतात. केस गळणे या समस्येची दोन कारणे असू शकतात. पहिलं कारण म्हणजे बदलेली जीवनशैली दुसरे कारण म्हणजे केसांची निगा राखण्याची पद्धत.

केसांची योग्य काळजी घेण्यासाठी तेल लावणे महत्वाचे आहे. तेल लावल्यामुळे केसांची मुळे घट्ट होतात. आपण कोणते तेल लावता यावर देखील अवलंबून आहे. लहानपणी आपली आई अथवा आजी केसांना तेल लावून काळजी घेत असत. त्यामुळे केसांना तेल कधी आणि कसे लावावे हे जाणून घेणे महत्वाचे आहे. केसांच्या समस्येपासून सुटका हवी असल्यास केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.

आठवड्यातून एक अथवा दोन वेळा तेल लावा

केसांना योग्य पोषण आणि निगा राखण्यासाठी तेल मदतगार ठरते. आठवड्यातून एकदा अथवा दोनवेळा केसांना तेलाने मालिश करावे. केसांना योग्यरित्या तेल लावल्यामुळे केस सिल्की आणि चमकदार बनतात. केसांची मजबुती आणि ग्रोथसाठी केसांना तेल लावायला हवे.

केसांना तेल लावण्यासाठी ही पद्धत अवलंबून पाहा

केसांवर तेल लावण्यासाठी सर्वप्रथम तेल हलके गरम करा. तेल गरम झाल्यानंतर कोमट होण्यासाठी ठेवा. हे तेल एका वाटीत घ्या, आणि बोटांच्या सहाय्याने केसांच्या मुळांपर्यंत लावा. टाळूवर देखील तेल लावा. हळू हळू बोटांच्या सहाय्याने सर्कुलेशन मोडवर मसाज करा. याने डोक्याला आराम मिळेल. आपल्याला जर हवं असल्यास टॉवेलला गरम पाण्यात भिजवून केसांवर गुंडाळू शकता. याने टाळूवरील रक्तपुरवठा सुरळीत होईल.

जास्त वेळ तेल लावून ठेवू नये

ज्यांच्या टाळूवर कोंडा अधिक प्रमाणावर आहे. त्यांनी केसांवर तेल अधिक वेळ ठेऊ नये. तेलाने मसाज केल्यानंतर २ तासाने केस शॅम्पूने धुवून टाका. केस धुवून झाल्यानंतर कंडीशनर लावायला विसरू नका.

तेलाचा वापर कमी करा

केसांवर तेल कमी लावावे. संपूर्ण केसांवर तेल लावून केस चिपचिपित करू नये. योग्य प्रमाणावर तेल केसांवर लावावे. तेल लावल्यानंतर लगेच केस विंचरू नये. याने केस गळतीची समस्या अधिक उद्भवते.

हेड मसाजसाठी या तेलाचे करा वापर

केसांवर मसाज करण्यासाठी योग्य तेल वापरणे महत्वाचे आहे. यासाठी आपण खोबरेल तेल, तिळाचे तेल, बदाम तेल, भृंगराज तेल, आवळ्याचे तेल अशा प्रकारचे तेल वापरू शकतो.

Web Title: Frequent hair loss problem? Wrong method of oiling? The right method will help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.