Join us  

जास्वंद-मोगरा घालून केलेलं तेल लावा, विसरा केसाच्या समस्या! ऋजुता दिवेकरच्या आईने शेअर केला खास उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2023 9:40 AM

Rujuta Diwekar Gave Best Home Remedies For Long Silky Hair : लांबसडक-काळेभोर केस तर हवे पण त्यांच्या तक्रारीच वाढल्या तर? हा घ्या मस्त सुगंधी उपाय

आपल्यापैकी प्रत्येक स्त्रीला आपले केस लांबसडक, जाड, घनदाट असावेत असे वाटत असते. परंतु सध्या केस गळणे ही प्रत्येकीचीच एक गंभीर तक्रार झाली आहे. केस गळतीच्या समस्येसोबतच केस रुक्ष होणे, केसांचा पोत बिघडणे, केसांची वाढ खुंटणे, केस पातळ होणे यांसारख्या इतर समस्या देखील उद्भवतात. कधीकधी केस इतके खराब होतात की कोणतीही केसांची हेयर स्टाईल करण्याची इच्छा असूनही करता येत नाही. केसांची निगा राखणारी अनेक उत्पादने आणि हेअर फॉल विरोधी प्रॉडक्ट्स वापरुन देखील केसांच्या समस्या दूर होत नाहीत. केसांच्या या कायमच्या समस्या दूर करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक तेल, महागडे हेअर ऑईल, हेअर मास्क असे असंख्य प्रकार आपल्या केसांवर लावून बघतो. 

ऋतू बदलला की त्याचा केसांवर थेट परिणाम होतो. उन्हाळ्यात केसांचे कोरडेपणा आणि ते कमकुवत होणे आणि तुटणे यांसारख्या समस्या वाढू शकतात. अशा अनेक औषधी वनस्पती घरगुती उपचार आणि आयुर्वेदिक उपायांमध्ये वापरल्या जातात, ज्यामुळे केसांच्या या समस्यांपासून आराम मिळतोच, शिवाय केसांचे आरोग्य आणि पोतही सुधारतो. यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी काही उपाय सांगितले आहेत. हा उपाय म्हणजे घरगुती आयुर्वेदिक तेल. हे आयुर्वेदिक तेल कसे बनवायचे याची सिक्रेट रेसिपी त्यांच्या आईने त्यांना शिकवली आहे(Frizzy Hair, Dry Scalp, Split Ends? Rujuta Diwekar Has The Perfect Inexpensive Solution For All).

घरगुती आयुर्वेदिक हेअर ऑइल तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :- 

१. जास्वंदीची फुले - २०२. कडुलिंबाची पाने - ३०३. कढीपत्ता पाने - ३० ४. कांदा - ५ (छोट्या आकारातील)५. मेथी दाणे - १ टेबलस्पून ६. कोरफड - २ ते ३ टेबलस्पून ७. मोगऱ्याची फुले - १५ ते २० फुले  ८. खोबरेल तेल - १ लिटर 

वजन कमी करण्याचा ५० - ३५ - १५ फॉर्म्युला, ऋजुता दिवेकर सांगतात लठ्ठपणा कमी करण्याची खास ट्रिक...

घरगुती आयुर्वेदिक हेअर ऑइल कसे बनवावे :-  

१. एक चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजवून सुमारे तासभर असेच ठेवा.२. कोरफडीच्या पानाच्या मध्यभागातील गर काढून घ्यावा. ३. नंतर, एका मोठ्या भांड्यात, खोबरेल तेल सोडून सर्व जिन्नस एकत्रित करावे. ४. आता हे सर्व जिन्नस एका मिक्सरच्या भांड्यात ओतून, मिक्सरमध्ये त्यांची बारीक पेस्ट करुन घ्यावी. 

आता विसरा केसगळती, केस घनदाट करण्यासाठी आजीच्या बटव्यातील सिक्रेट नैसर्गिक शॅम्पूची जादू...

५. औषधी वनस्पती बारीक केल्यानंतर, ही पेस्ट एक लिटर खोबरेल तेलात मिसळा आणि शिजवा.६. लक्षात ठेवा की ते फक्त मंद आचेवर शिजवा आणि सुमारे ३० ते ४० मिनिटे शिजवा.७. मिश्रण थोडे दाटसर घट्ट झाल्यावर आचेवरून उतरवा आणि पूर्णपणे थंड होऊ द्या.८. नंतर हे तेल गाळून घ्या आणि काचेच्या बाटलीत भरुन ठेवा. 

या तेलाचा वापर केसांवर कसा करावा ?

१. तुमचे केस २ ते ३ भागात विभागून घ्या आणि या तेलाने तुमच्या स्कॅल्प आणि केसांना पूर्णपणे मसाज करा.२. ज्यांना केस कोरडे पडण्याची तक्रार असेल त्यांनी या घरगुती आयुर्वेदिक तेलाने मसाज करावा. ३. आपण हे तेल बनवण्यासाठी खोबरेल तेलाऐवजी तीळाच्या तेलाचा देखील वापर करु शकतात.

हे घरगुती आयुर्वेदिक तेल लावण्याचे फायदे :- 

१. हे आयुर्वेदिक तेल केसांच्या समस्यां दूर करण्यास मदत करते. २. कोरड्या केसांवर नियंत्रण मिळवता येते.३. टाळूचा कोरडेपणा आणि कोंड्याची समस्या दुर करण्यासाठी फायदेशीर.४. केस गळणे किंवा केस वाढत नसल्याच्या समस्येपासून मुक्ती मिळते. ५. केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.६. केस पातळ होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स