Lokmat Sakhi >Beauty > ताकाचे भन्नाट फायदे, चेहऱ्याची त्वचा होईल मऊमुलायम-सतेज आणि केसही होतील काळेभोर, करुन पाहा..

ताकाचे भन्नाट फायदे, चेहऱ्याची त्वचा होईल मऊमुलायम-सतेज आणि केसही होतील काळेभोर, करुन पाहा..

Buttermilk Benefits ताकाच्या मदतीने त्वचा आणि केस बनवा सुंदर, या पद्धतीने करा त्याचा वापरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2022 01:23 PM2022-12-16T13:23:35+5:302022-12-16T16:57:08+5:30

Buttermilk Benefits ताकाच्या मदतीने त्वचा आणि केस बनवा सुंदर, या पद्धतीने करा त्याचा वापरा

From facial softening to hair care; These are the amazing benefits of buttermilk | ताकाचे भन्नाट फायदे, चेहऱ्याची त्वचा होईल मऊमुलायम-सतेज आणि केसही होतील काळेभोर, करुन पाहा..

ताकाचे भन्नाट फायदे, चेहऱ्याची त्वचा होईल मऊमुलायम-सतेज आणि केसही होतील काळेभोर, करुन पाहा..

ताकाचं सेवन आपण उन्हाळ्यात अधिक प्रमाणावर करतो. यासह पचनक्रिया सुधारण्यास देखील मदत करतात. ताक आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. त्यातील गुणधर्म शरीराला ऊर्जा आणि चेहरा तजेलदार बनवण्यास मदत करतात. यासोबतच ताकाच्या मदतीने केसांचे सौंदर्यही वाढवता येते. ताक त्वचेवर नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करतात. याने चेहऱ्याला नैसर्गिक चमक मिळते. चला तर मग जाणून घेऊया ताकाचा वापर करून चेहऱ्याची आणि केसांची निगा कशी राखली जाते.

त्वचेवर अशा प्रकारे वापरा ताक

संत्री पावडर फेसपॅक

चेहर्‍यावर मुरुमांचे डाग असतील तर ताकाच्या मदतीने कमी करण्यास मदत होईल. सर्वप्रथम संत्र्याच्या सालीच्या पावडरमध्ये ताक मिसळून फेस पॅक बनवा. हा पॅक चेहऱ्यावर १५ मिनिटे ठेवा, पॅक कोरडा झाल्यावर चेहरा पाण्याने धुवा. उत्तम रिझल्टसाठी हा पॅक आठवड्यातून २ वेळा लावा.

मसूर - ताक फेसपॅक

जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी असेल तर मसूर पावडर उपयुक्त ठरेल. सर्वप्रथम मसूर पावडर आणि बेसन एकत्र करून त्यात ताक घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. पॅक कोरडा झाल्यावर पाण्याने धुवा. याने त्वचेला नैसर्गिक चमक येईल व ग्लो करेल.

अशा प्रकारे केसांना लावा ताक

केस कोरडे, निर्जीव आणि कमकुवत झाले असतील तर ताक असरदार उपाय ठरेल. सर्वप्रथम, केळी मॅश करून त्यात ऑलिव्ह आणि ताक मिसळून मास्क बनवा. हा हेअर मास्क केसांना लावा. याने केसांचे आरोग्य सुधारते यासह केस दाट, मजबूत आणि काळेभोर होतात.

स्काल्पवरील मुरुमांपासून देईल आराम

टाळूमध्ये कोंडा आणि खाज उठत असल्यास हलक्या हातांनी ताकाने मसाज करा. नंतर केस धुवा. याच्या वापराने डोक्यातील कोंडा आणि खाज सुटण्यापासून मदत मिळते.

Web Title: From facial softening to hair care; These are the amazing benefits of buttermilk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.