Lokmat Sakhi >Beauty > फक्त १० रुपयांत घरच्याघरी करा फ्रुट फेशियल, टॅनिंग कमी होऊन त्वचा दिसेल उजळ- चमकदार

फक्त १० रुपयांत घरच्याघरी करा फ्रुट फेशियल, टॅनिंग कमी होऊन त्वचा दिसेल उजळ- चमकदार

Fruit Facial At Home In Just 10 Rupees: थंडीमुळे त्वचा कोरडी पडली असेल किंवा टॅनिंग हाेऊन खूप काळवंडली असेल तर हा उपाय तुम्हाला नक्कीच खूप फायदेशीर ठरू शकतो. (home remedies for tanned and dry skin in winter)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2024 04:22 PM2024-01-18T16:22:09+5:302024-01-18T16:22:52+5:30

Fruit Facial At Home In Just 10 Rupees: थंडीमुळे त्वचा कोरडी पडली असेल किंवा टॅनिंग हाेऊन खूप काळवंडली असेल तर हा उपाय तुम्हाला नक्कीच खूप फायदेशीर ठरू शकतो. (home remedies for tanned and dry skin in winter)

Fruit facial at home in just 10 Rupees, How to do fruit facial, home remedies for tanned and dry skin in winter | फक्त १० रुपयांत घरच्याघरी करा फ्रुट फेशियल, टॅनिंग कमी होऊन त्वचा दिसेल उजळ- चमकदार

फक्त १० रुपयांत घरच्याघरी करा फ्रुट फेशियल, टॅनिंग कमी होऊन त्वचा दिसेल उजळ- चमकदार

Highlightsआपल्या घरात सहज उपलब्ध असणारं साहित्य वापरूनच आपण हे फेशियल करणार आहोत.

हिवाळ्यात त्वचेची जरा जास्तच काळजी घ्यावी लागते. कारण थंड हवेमुळे त्वचा कोरडी होते. कोरडी त्वचा खूप लवकर टॅन होते आणि काळवंडून जाते. म्हणूनच हिवाळ्यात कोरड्या आणि काळवंडलेल्या त्वचेसाठी हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा. यामध्ये आपण घरच्याघरी फ्रुट फेशियल कसं करायचं ते पाहूया (How to do fruit facial). हा उपाय करण्यासाठी आपल्याला जे काही सामान लागणार आहे, त्याची किंमत १० रुपयांपेक्षा जास्त मुळीच

नाही (Fruit facial at home in just 10 Rupees). आपल्या घरात सहज उपलब्ध असणारं साहित्य वापरूनच आपण हे फेशियल करणार आहोत. (home remedies for tanned and dry skin in winter)

 

घरच्याघरी कसं करायचं फ्रुट फेशियल?

घरच्याघरी फ्रुट फेशियल कसं करायचं याविषयीचा एक व्हिडिओ aanchalnavneetjain या पेजवर शेअर करण्यात आला आहे. ४ स्टेपमध्ये फेशियल कसं करायचं हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे.

उडीद डाळीचे टम्म फुगलेले आप्पे, पीठ आंबविण्याचीही गरज नाही- मुलांच्या डब्यासाठी चवदार मेन्यू

सगळ्यात आधी तर एका वाटीत अर्धा चमचा ॲलोव्हेरा जेल घ्या. त्यात ४ ते ५ केशराच्या काड्या टाका. हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित एकत्र करून त्या मिश्रणाने चेहऱ्याला ३ ते ४ मिनिटे मसाज करा. असं केल्याने चेहऱ्याचं क्लिंझिंग होईल.

 

यानंतर २ टेबलस्पून तांदूळ मिक्सरमधून फिरवून घ्या आणि त्याची पावडर करा. या पावडरमध्ये आता थोडं ॲलोव्हेरा जेल आणि थोडंसं पाणी टाका आणि त्याची पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट लावून चेहऱ्याला ४ ते ५ मिनिटे हळूवार मसाज करा. हा एक नॅचरल स्क्रब आहे. यामुळे त्वचेवरचं टॅनिंग तसेच डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा मऊ होईल.

तुम्ही प्यायला आहे का कधी बिर्याणी चहा? चहामध्ये टाकले आहेत चक्क..... बघा व्हायरल व्हिडिओ

आता या दोन स्टेप केल्यानंतर तिसरी स्टेप करण्यासाठी आपल्याला केळी आणि पपई लागणार आहे. केळी आणि पपई मिक्सरमधून वाटून घ्या. त्यात थाेडं कच्चं दूध टाका. या मिश्रणाने चेहऱ्याला १० ते १२ मिनिटे मसाज करा.

बघा स्वयंपाक घरातल्या 'या' पांढऱ्या पदार्थाची जादू- त्वचा आणि केस दोन्हींसाठी ठरतो वरदान

आता शेवटची स्टेप आहे चेहऱ्याला फेसपॅक लावणे. यासाठी एका वाटीत मुलतानी माती घ्या. त्यात गुलाबपाणी टाकून कालवून घ्या आणि तो फेसपॅक चेहऱ्याला लावा. फेसपॅक सुकला की चेहरा धुवून घ्या आणि मॉईश्चरायझर लावा.

 

Web Title: Fruit facial at home in just 10 Rupees, How to do fruit facial, home remedies for tanned and dry skin in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.