फेशियल (Fecial) केल्यानं त्वचेवर सुंदर निखार येतो. बरेच लोक पार्लरला जाऊन फेशियल करतात पण प्रत्येक महिन्यात पार्लरला जाऊन फेशियल करणं शक्य नसतं. घरी फेशियल करताना योग्य खबरदारी घेतली नाही तर त्वचेचं नुकसान होऊ शकतं. (Skin Care Tips) पार्लरमध्ये जेव्हा ब्युटीशियन स्क्रब चेहऱ्यावर लावून अनेक मिनिटं घासत असते तेव्हा चेहरा उजळ होईल असं आपल्याला वाटतं. घरच्याघरी फेशियल करण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. यामुळे चेहऱ्यावर डबल उजळपणा येईल. स्टेप बाय स्टेप फेशियल कसे करायचं ते पाहूया. (Ganesh Chaturthy Special)
1) पहिली स्टेप
फेशियलची पहिली स्टेप स्किन क्लिंजिंगची आहे. स्किन क्लिंजिंग करण्यासाठी तुम्ही दुधात गुलाबपाणी मिसळून रूईच्या साहाय्याने चेहऱ्याला लावू शकता. ज्यामुळे चेहरा उजळ होतो आणि त्वचेवर जमा झालेली घाण निघून जाण्यास मदत होते. 3 ते 4 मिनिटं चेहरा क्लिन केल्यानंतर पाण्यानं धुवून स्वच्छ करा.
पाठीत- गुडघ्यांमध्ये वेदना, हाडं कमजोर झाली? रामदेव बाबा सांगतात १ खास उपाय, दुखणं होईल कमी
2) दुसरी स्टेप
स्किन उजळ होण्यासाठी एक्सफोलिट करणं ही खूपच सोपी स्टेप आहे. स्किन एक्सफोलिएट करण्यासाठी एका वाटीत कॉफीची पावडर घ्या त्यात थोडं मध मिसला. त्यानंतर हे मिश्रण बोटांच्या साहाय्यानं चेहऱ्यावर मळून घ्या एक ते दोन मिनीटांनी चेहरा धुवून स्वच्छ करा. या कॉफी स्क्रबच्या वापरानं चेहऱ्याच्या मृत पेशी निघून जाण्यास मदत होईल.
3) तिसरी स्टेप
त्वचेवर मसाज करा यासाठी 10 ते 12 मिनिटं चेहऱ्याची मसाज करा. चेहऱ्यावर हलक्या हातानं सर्क्युलर, आऊटवर्ड आणि अपवर्ड मोशनने मसाज करा. चेहरा डाऊनवर्डन मोशनने मसाज करू शकता. नाहीतर त्वचा लटकू शकते.
4) चौथी स्टेप
चेहऱ्याची मसाज केल्यानंतर चेहऱ्याला स्टिम द्यायला विसरू नका. कोणत्याही भांड्यात गरम पाणी काढून घ्या त्यानंतर यावर चेहरा ठेवा नंतर आपलं डोकं टॉवेलनं कव्हर करून घ्या. काहीवेळा वाफ घेतल्यानंतर चेहरा टॉवेलनं पुसून स्वच्छ करा.
5) शेवटची स्टेप
फेशियलच्या शेवटच्या स्टेपमध्ये तुम्ही चेहऱ्याला फेस मास्क लावू शकता. हा फेस मास्क बाजारातून तुम्ही विकत घेऊ शकता. चेहऱ्यावर मुल्तानी माती लावू शकता. याव्यतिरिक्त मध, दही एकत्र मिसळून चेहऱ्याला लावा चेहरा धुतल्यानंतर मॉईश्चराजर लावायला विसरू नका. या पद्धतीनं सहज फेशियल करून होईल.