बिघडलेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना केसांची काळजी घ्यायला जमेलच असे नाही. केसांकडे पुरेसे लक्ष न देणे, यासह आहारातून पुरेसे पोषण न मिळणे, यामुळे केस लवकर पांढरे होतात. सूर्याची किरणे यासह प्रदुषणामुळे देखील केसांचे नुकसान होते. ज्यामुळे अकाली वयात केस पांढरे होतात. जर पांढऱ्या केसांना नैसर्गिकरित्या काळे करायचे असेल तर, कांदा आणि लसणाच्या सालींचा वापर करा.
कांदा आणि लसणाची साल आपण बहुतांश वेळा फेकून देतो. पण साली फेकून न देता त्याचा वापर पांढऱ्या केसांवर करा. या सोपा उपायाची माहिती इन्स्टाग्रामवर ब्युटी एक्सपर्ट अन्नू यांनी शेअर केली आहे. पांढरे केस काळे करण्यासाठी लसूण आणि कांद्याच्या सालींचा वापर कसा करावा? याच्या वापराने खरंच फरक पडतो का? पाहूयात(Garlic and Onion for White Hair: Benefits and Uses).
केस काळे करण्यासाठी कांदा आणि लसणाच्या सालींचा वापर
सर्वप्रथम, एक कप लसणाची साल आणि कांद्याची साल घ्या. गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक कप लसणाची साल आणि कांद्याची साल घालून भाजून घ्या. नंतर त्यात एक चमचा कलौंजी घालून भाजून घ्या. तिन्ही गोष्टी एकत्र भाजून झाल्यानंतर गॅस बंद करा. यानंतर मिक्सरच्या भांड्यात तिन्ही गोष्टी घालून पावडर तयार करा.
चेहरा उजळ - मान काळी? ३ घरगुती उपाय, मान दिसेल स्वच्छ आणि उजळ
तयार पावडर एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर त्यात ३ चमचे मोहरीचे तेल घालून मिक्स करा. १२ तासानंतर या तेलाचा वापर करा. आपण हे तेल रात्री केसांवर लावू शकता. सकाळी पाण्याने केस धुवा. या तेलामुळे काही दिवसात फरक दिसून येईल. यासह डाएटमध्ये पौष्टीक आहार, व लाईफस्टाईलमध्ये काही सकारात्मक बदल केल्याने केस लवकर काळे होतील.
केसांसाठी लसूण आणि कांद्याच्या सालींचे फायदे
अँटिऑक्सिडंट्स
कांदा आणि लसणाच्या सालींमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो. ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे केस पांढरे होतात.
सल्फर
कोलेजन आणि केराटिन तयार करण्यासाठी सल्फर आवश्यक आहे. केराटिन आणि कोलेजन हे निरोगी केसांसाठी गरजेचं आहे. कांदा आणि लसणाच्या सालीमध्ये सल्फर मुबलक प्रमाणात असते.
शरीराला घामामुळे दुर्गंध येतो? आंघोळीच्या पाण्यात मिसळा ५ रुपयांची पांढरी गोष्ट - दिवसभर राहाल फ्रेश
अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी परिपूर्ण
कांदा आणि लसणाच्या सालींमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे टाळूला निरोगी ठेवण्यास आणि कोंडा कमी करण्यास मदत करतात.