असं म्हणतात की आपण जे काही खात असतो, त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर आणि चेहऱ्यावर दिसत असतो. म्हणजेच आपण जर पौष्टिक पदार्थ खात असू तर आपोआपच आपली त्वचा निरोगी, चमकदार होते. पण बऱ्याचदा असं होतं की आपल्या आहाराकडे आपलं म्हणावं तसं लक्ष देणं होत नाही. घरातले सकस अन्न सोडून आपण विकतच्या चटकदार पदार्थांवर ताव मारतो. त्यामुळे मग आरोग्याच्या जशा तक्रारी निर्माण होतात, तसेच परिणाम त्वचेवरही दिसून येतात. म्हणूनच आता चेहऱ्यावर वरवरचे क्रिम चोपडण्यापेक्षा हा एक सोपा उपाय करून पाहा (how to get radiant glowing skin naturally?). हा उपाय केल्यामुळे शरीराला आवश्यक ते पोषक घटक मिळतील आणि त्वचा काही दिवसांतच अतिशय निरोगी, चमकदार होईल.(get an amazing glow on skin in just 3 weeks)
त्वचेवर ग्लो येण्यासाठी खास घरगुती उपाय
त्वचेवर छानसा ग्लो पाहिजे असेल तर त्यासाठी कोणता घरगुती उपाय करावा याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी dieticianricha2095 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
वजन कमी करायचं? 'या' पद्धतीने नारळ खा; सुटलेलं पाेट, जाडजूड मांड्या- दंड सर्रकन होतील कमी
यामध्ये त्यांनी ४ पदार्थांपासून तयार केलेला ज्यूस दररोज पिण्याचा सल्ला दिला आहे. हा ज्यूस प्यायल्यास तुमची त्वचा तर छान होईलच पण आरोग्यालाही अनेक फायदे होतील.
हा ज्यूस तयार करण्यासाठी आपल्याला मध्यम आकाराचे अर्धे बीट, कडिपत्त्याची ७ ते ८ पाने, १ आवळा आणि अर्धे गाजर एवढे साहित्य लागणार आहे.
बीट, गाजर आणि आवळा बारीक चिरून घ्या. त्यानंतर हे सगळे पदार्थ आणि कडिपत्ता मिक्सरमध्ये टाका. या मिश्रणात १ कप नारळपाणी घाला आणि मिक्सरमध्ये त्याचा ज्यूस करून घ्या.
तांदूळ धुवून पाणी फेकून देता? ४ पद्धतींनी वापरा- बघा राईस वॉटरचे एकापेक्षा एक भन्नाट उपयोग
या ज्यूसमध्ये थोडं साधं पाणी घालून तो पातळ करा आणि दररोज सकाळी नाश्त्याच्यावेळी प्या. हा उपाय काही दिवस केल्यास त्वचेवर खूप छान परिणाम दिसून येईल.
हा उपाय तर कराच पण त्यासोबतच सकस आहार घ्या. स्किन केअर रुटीन व्यवस्थित ठेवा.