चेहऱ्याप्रमाणेच हाता-पायांचीही काळजी घेणे गरजेचे आहे. अधिक वेळ पायांकडे दुर्लक्ष केल्यास त्वचेवर डेड स्किनचे थर साचू लागतात. उन्हाळ्यात अनेक वेळा त्वचा टॅन होते (Tanning). पाय एकदम खडबडीत होतात. हे टाळण्यासाठी, आठवड्यातून किमान १ ते २ वेळा आपल्या पायांची स्वच्छता करावी लागते (Skin Care Tips). आपण पाय नेहमी साबणाने धुतो. पण पायांच्या स्वच्छतेसाठी तेवढेच पुरेसे नाही.
पायांची डेड स्किन आणि टॅनिंग घालवण्यासाठी आपण ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन खर्च करतो. जर आपल्या पार्लरमध्ये न जाता पेडीक्युअर घरात करायचं असेल तर, टूथपेस्टचा वापर करून पाहा. ब्यूटी पार्लरमध्ये करतात, तसे पाय स्वच्छ होतील, दिसतील सुंदर(Get fairer feet with this DIY feet whitening pedicure).
टूथपेस्टने घरात करा पायांचे पेडीक्युअर
घरगुती पेडीक्युअरसाठी आपल्याला टूथपेस्ट लागेल. यासाठी एका वाटीत एक चमचा टूथपेस्ट घ्या. त्यात एक चमचा गुलाब जल, एक चमचा तांदुळाचे पीठ आणि एक चमचा एलोवेरा जेल घालून मिक्स करा. अशा प्रकारे आपली घरगुती पेडीक्युअर क्रीम रेडी.
हळद दूधात घालून प्यावी की पाण्यात? पाहा, कशाने शरीराला मिळते दुप्पट ताकद
घरात पेडीक्युअर कसे करावे?
पाय सर्वात आधी स्वच्छ धुवून घ्या. संपूर्ण पायांवर टूथपेस्ट लावा. जुन्या टूथब्रशच्या साहाय्याने साधारण ५ मिनिटे पाय स्क्रब करत राहा. नंतर दगडाने टाच घासून स्वच्छ करा. आता आपले पाय कोमट पाण्यात भिजवा आणि काही वेळाने पुन्हा स्क्रब करा. नंतर टॉवेलने पाय नीट पुसून घ्या. शेवटी मॉइश्चरायझरने पायांना मसाज करा. अशा प्रकारे घरातच पायांचे पेडीक्युअर होईल.
पायांच्या तळव्यांची जळजळ होते? ५ घरगुती उपाय - पायांची आग होईल बंद लवकर
घरगुती पेडीक्युअर करण्याचे फायदे
टूथपेस्टचा वापर करून पेडीक्युअर केल्याने डेड स्किन निघून जाईल. यामुळे टॅनिंगही बऱ्याच प्रमाणात दूर होईल. आठवड्यातून एकदा तरी अशा प्रकारे पेडीक्युअर केल्यास पाय स्वच्छ राहतील आणि ब्युटी पार्लरमध्ये महागड्या पेडीक्युअरवर खर्च करण्याची वेळ देखील येणार नाही.