Join us  

बीट आणि कोरफडीची बनवा घरच्याघरी फेसक्रीम, चमकदार त्वचेसाठी स्वस्तात मस्त सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2022 7:17 PM

कितीही महागडे काॅस्मेटिक्स प्रोडक्ट्स आणि सौंदर्य प्रसाधनं वापरुनही चेहेऱ्यावर अपेक्षित परिणाम दिसत नसतील, चेहेऱ्यावर हवा असलेला ग्लो दिसत नसेल तर त्यावर घरगुती उपायांचा (home remedy for glowing skin) मार्ग अवलंबवावा. त्वचेचं पोषण होवून त्वचा निरोगी आणि सुंदर दिसण्यासाठी बीट आणि कोरफड गर यापासून घरच्याघरी फेस क्रीम ( homemade face cream with beetroot and aloe vera gel) तयार करता येतं. 

ठळक मुद्देबिटाचा रस आणि कोरफड गर यापासून फेस क्रीम तयार करताना त्यात इतर कोणताही घटक घालू नये. बिटाचा रस त्वचेसाठी टोनरचं काम करतं. कोरफडमधील गुणधर्मामुळे चेहेऱ्यावरील सुरकुत्या, फाइन लाइन्स कमी होतात.

चेहरा सुंदर दिसावा, चेहेऱ्यावर ग्लो यावा, त्वचा निरोगी व्हावी या प्रत्येक गोष्टीसाठीचे उपाय आपण विकत मिळणाऱ्या काॅस्मेटिक्स प्रोडक्टसमधून, क्रीम्स-जेलमधून शोधत असतो. पण बाहेरचं प्रदूषण, हवेत असलेले जिवाणू, खाणंपिणं, बदललेली (बिघडलेली) जीवनशैली या कारणांमुळे कितीही महागाचे आणि ब्रॅण्डेड क्रीम्स, जेल वापरले तरी सौंदर्यविषयक समस्या (beauty probelms)  निर्माण होतात. चेहेऱ्यावर अपेक्षित परिणाम दिसतंच नाही, हवा असलेला ग्लो येत नाही. अशा वेळेस चेहेऱ्यावर आणखी काय लावायला हवं असा विचार करत असाल तर काॅस्मेटिक्सवर अवलंबून न राहाता स्वत: काय करता येईल (home remedy on beauty problems) याचा विचार करा. घरगुती आणि नैसर्गिक उपायांमधून आपल्याला चेहेऱ्यावर हवी असलेली चमक तर मिळवता येतेच सोबतच त्वचेचं पोषण करुन त्वचा निरोगीही करता येते.  चेहेऱ्यावर ग्लो येण्यासाठी आणि त्वचा निरोगी होण्यासाठी बीट आंणि कोरफड वापरुन घरच्याघरी फेस क्रीम ( homemade face cream with beetroot and aloe vera gel)  तयार करता येतं.

Image: Google

 बीट आणि कोरफडपासून फेस क्रीम

बीट आणि कोरफडपासून फेस क्रीम तयार करण्यासाठी 2 चमचे बिटाचा रस, 2 चमचे ताज्या कोरफडचा गर घ्यावा. क्रीम तयार करताना एका वाटीत बिटाचा रस काढावा. या रसात कोरफड गर एकत्र करावा. या मिश्रणाचं जेल होईपर्यंत हे मिश्रण सतत फेटत राहावं. मिश्रण जेलसारखं दिसायला लागलं की फेटणं थांबावं. हवाबंद डब्बीत हे जेल भरुन ठेवावं. चेहेरा धुतल्यानंतर हे क्रीम चेहेऱ्यास हलका मसाज करत लावावं. बीट आणि कोरफड गर यापासून क्रीम तयार करताना त्यात इतर कोणतीही गोष्ट घालू नये. तसेच हे क्रीम लावल्यानंतर चेहेऱ्यावर दुसरं क्रीम किंवा जेल लावू नये. 

Image: Google

काय होतात फायदे?

त्वचा उजळ होण्यासाठी बीट रस आणि कोरफड रस यापासून तयार केलेलं क्रीम लावण्याचा जो फायदा होतो तो बीट आणि कोरफडमध्ये असलेल्या गुणधर्मातून. बिटाच्या रसातील गुणधर्मामुळे चेहेऱ्यावरील मुरुम, पुटकुळ्या, फोड, डाग निघून जातात. बिटाचा रस हा त्वचेसाठी टोनर सारखा काम करतो. बिटाचा वापर जर नित्यनेमानं चेहेऱ्यावर केल्यास त्वचेशी निगडित समस्या दूर होतात.  कोरफडमध्ये 90 टक्के पाणी असतं. कोरफड गराचा वापर त्वचेवर केल्यास त्वचा आतून ओलसर होण्यास मदत होते. कोरफडमध्ये जीवनसत्व, खनिजं, विकर, सैलिसिलिक ॲसिड, लिग्निन, सेपोनिन आणि अमीनो ॲसिड हे त्वचेस फायदेशीर घटक असतात. कोरफड गर त्वचेवर नियमित लावल्यास चेहेऱ्यावरील मुरुम पुटकुळ्यांची समस्या कमी होते. कोरफडमधील दाह आणि सूज विरोधी गुणधर्मामुळे चेहऱ्याच्या त्वचेला खाज येणं , पुरळ येणं या समस्या कमी होतात. कोरफडमधील गुणधर्मामुळे चेहेऱ्यावरील सुरकुत्या,  फाइन लाइन्स कमी होतात. बीट आणि कोरफडमधील या गुणधर्मामुळेच बीट आणि कोरफड गर यापासून घरी तयार केलेल्या या फेस क्रीम्सचा चांगला परिणाम त्वचेवर दिसून येतो. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडीत्वचेची काळजी