Lokmat Sakhi >Beauty > दिवाळीत चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो हवाय? करा ३ स्टेप फेशियल, दिवाळीत चेहऱ्यावर येईल चमक

दिवाळीत चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो हवाय? करा ३ स्टेप फेशियल, दिवाळीत चेहऱ्यावर येईल चमक

get glowing skin in Diwali with 3 simple steps skin Care home remedies : ऐन सणावाराला आपला चेहरा खराब झाला असेल तर करा हे सोपे उपाय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2024 04:53 PM2024-10-30T16:53:45+5:302024-10-30T18:50:18+5:30

get glowing skin in Diwali with 3 simple steps skin Care home remedies : ऐन सणावाराला आपला चेहरा खराब झाला असेल तर करा हे सोपे उपाय..

get glowing skin in Diwali with 3 simple steps skin Care home remedies : Want an instant glow on your face this Diwali? Try the 3 step facial formula, look handsome... | दिवाळीत चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो हवाय? करा ३ स्टेप फेशियल, दिवाळीत चेहऱ्यावर येईल चमक

दिवाळीत चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो हवाय? करा ३ स्टेप फेशियल, दिवाळीत चेहऱ्यावर येईल चमक

दिवाळीची साफसफाई, फराळ यासगळ्यात पार्लरला जाणे प्रत्येकीलाच शक्य होते असे नाही. शिवाय धूळ, फराळ करताना गॅससमोर उभं राहिल्याने चेहऱ्याची होणारी अवस्था आणि हवेतील प्रदूषणामुळे याकाळात चेहरा खराब होतो. तसेच दुसरीकडे ऑक्टोबर हीट संपून हिवाळा सुरू होण्याचा हा काळ असल्याने त्वचा कोरडी व्हायला सुरुवात झालेली असते. या सगळ्यामुळे ऐन सणावाराला आपला चेहरा खराब दिसतो. मग मेकअप करुन आपल्याला चेहऱ्यावरचे सगळे डाग, फोड लपवावे लागतात. सणासुदीच्या काळात त्वचेची काळजी घेत इन्स्टंट ग्लो कसा आणायचा यासाठी घरच्या घरी काही सोपे उपाय केले तर त्याचा फायदा होतो. यामुळे आपण फ्रेश आणि ताजेतवानेही दिसू शकतो (get glowing skin in Diwali with 3 simple steps skin Care home remedies). 

घरच्या घरी फेशियलसारखा ग्लो मिळवण्यासाठी.. 

१.  फेस क्लिनिंग - एक कप दुधात २ चमचे मध घालून ते चांगले एकजीव करा. ते फ्रीजरमध्ये ठेवून त्याचे आईस क्युब बनवा. स्वच्छ चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी हे दुधाचे आईस क्युब चेहर्‍यावर फिरवा. ज्यामुळे तुमच्या चेहर्‍याचे क्लिंझिंग होईल. हे क्युब तुम्ही एका झीपलॉक पिशवीत ठेवून ती पिशवी फ्रिजर मध्ये ठेवून साठवू शकतात. ज्यामुळे हा उपाय तुम्ही रोज करू शकाल. 

२.  स्क्रब - २ टीस्पून कोणतीही कॉफी पावडर आणि एक टीस्पून खोबरेल तेल मिक्स करा आणि 3 मिनिटे चेहरा आणि मानेला हलक्या हाताने मसाज करा. नंतर साध्या पाण्याने धुवून घ्या. कॉफीमुळे चेहर्‍याचा रंग उजळण्यास मदत होते. 

३. फेस मास्क - १ चमचा लाल चंदन पावडर आणि १ चमचा मध मिसळून पेस्ट बनवा. हा पॅक संपूर्ण चेहर्‍याला लावा. १५-२० मिनिटे तसाच राहू द्या. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. प्रत्येक उपाय करताना आधी पॅच टेस्ट करणे महत्त्वाचे आहे जेणेकरुन तुम्हाला कोणत्या गोष्टीची अॅलर्जी असेल ते वेळीच लक्षात येईल. 


Web Title: get glowing skin in Diwali with 3 simple steps skin Care home remedies : Want an instant glow on your face this Diwali? Try the 3 step facial formula, look handsome...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.