सध्या संक्रांतीचे हळदी- कुंकू, लग्नसराई असे सगळीकडेच उत्साहाचे वातावरण आहे. अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी तयार होण्याचा उत्साह महिलांमध्ये काही वेगळाच असतो. आठवड्यातून दोन- तीन वेळा तरी कुणाकडे हळदी- कुंकू असतेच. प्रत्येकवेळी आपला लूक फ्रेश दिसावा असं वाटतं. पण सतत पार्लरमध्ये जाणंही शक्य नसतं. म्हणूनच घरच्याघरी घरातलंच साहित्य वापरून झटपट ब्लीच कसं करायचं (How to do bleach at home?) ते एकदा पाहून घ्या. हा उपाय केल्यानंतर अवघ्या १० मिनिटांतच बघा तुमच्या चेहऱ्यावर कसा छान गोल्डन ग्लो येईल (Get golden glow on your skin in just 10 minutes)... शिवाय हा उपाय केल्यानंतर मेकअप केला, तर तो चेहऱ्यावर खूप चांगल्या पद्धतीनेही बसेल. (Home remedies for glowing skin)
घरच्याघरी ब्लीच करण्याची सोपी पद्धत
घरच्याघरी ब्लीच कसं करायचं याची साेपी पद्धत anubeauty.tips या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला लिंबाची १ लहान फोड, टोमॅटोच्या २ फोडी, १ टीस्पून तांदूळ, १ टीस्पून दही, १ टीस्पून बेसन पीठ आणि चिमूटभर हळद असं साहित्य लागणार आहे.
बनारसच्या विणकरांकडे वाढली राम मंदिर थीम साडीची मागणी, पाहा कशी दिसते ती सुंदर साडी..
सगळ्यात आधी लिंबू, टोमॅटो आणि तांदूळ एकत्र करा आणि मिक्सरमधून वाटून त्याची बारीक पेस्ट करून घ्या. तांदूळ वापरण्यापुर्वी ते एकदा धुवून घ्या.
यानंतर या मिश्रणामध्ये आता बेसन पीठ, दही आणि हळद टाका आणि सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.
आता चेहरा थोडा ओलसर करून हा लेप तुमच्या चेहऱ्याला लावा.
७ ते ८ मिनिटे झाल्यानंतर लेप थोडा सुकला आहे, असं वाटलं की मग चेहरा धुवून टाका.
मेहेंदी लावल्याने केस कोरडे होतात? ३ पदार्थ घालून मेहेंदी भिजवा, छान रंग चढून केस होतील मऊ
चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्याला टोनिंग आणि मॉईश्चराईज करायला विसरू नका.
हा उपाय केल्यामुळे चेहऱ्यावर छान गोल्डन ग्लो तर येईलच. पण टॅनिंग, डेड स्किन निघून जाण्यासही मदत होईल. ज्यांच्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन आहेत, त्यांच्यासाठीही हा उपाय खूपच चांगला आहे. कारण यामुळे स्किन टोन एकसारखा होण्यास मदत होते.