बटाटा हा एक असा पदार्थ आहे, जो प्रत्येक भाजीमध्ये फिट होतो. बटाटा फक्त भाजी बनवण्यासाठी नसून, चेहरा व केसांसाठी देखील वापरला जाऊ शकतो. अनेक जण बटाटा वापरून त्याची साल फेकून देतात. पण आपल्याला माहित आहे का, कचऱ्यात जाणाऱ्या बटाट्याच्या सालींचा वापर आपण केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी करू शकतो.
केसांसाठी पोषक असलेले घटक बटाट्याच्या सालींमध्ये आहेत. बटाट्याच्या सालीमुळे केसगळती रोखली जाऊ शकते. ज्याने केस नैसर्गिकरित्या काळे होतात. यामुळे बटाट्याची साल कचऱ्यामध्ये फेकण्याऐवजी त्यांचा केसांसाठी वापर करावा(Get Rid of Gray Hair Naturally With Potato Skins!).
बटाट्याच्या सालीतील पोषक घटक
बटाट्याच्या सालीमध्ये लोह, झिंक, कॉपर, कॅल्शिअम, पोटॅशिअम, नियासिन आणि मॅग्नेशिअम हे घटक आढळतात. यासह पॉलीफेनोल ऑक्सिडेज नावाचं एंझाइम असते. या पोषक तत्त्वामुळे केस निरोगी राहण्यास मदत मिळते. बटाट्याच्या सालीतील या घटकांमुळे केस काळे होण्यास मदत मिळते.
पोटॅटो पिल हेअर मास्कसाठी लागणारं साहित्य
बटाट्याचे साल एक कप
मध २ चमचे
एक चमचा एलोवेरा जेल
बटाट्याच्या सालींचा वापर करून बनवा हेअर मास्क
पोटॅटो पिल हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम, बटाट्याची साल काढून घ्या. यानंतर साले नीट धुवून पाण्यात भिजत ठेवा. अशाप्रकारे, सालींमधुन सर्व घाण निघून जाईल. आता एका भांड्यात पाणी घ्या, ते उकळवत ठेवा. आता त्यात बटाट्याची साल घाला. सुमारे १० मिनिटांनंतर, पाण्यातून साल काढा. नंतर ही साले चांगली मॅश करा, व त्यात मध आणि कोरफडीचे जेल घालून चांगले मिसळा. अशा प्रकारे बटाटा पील हेअर मास्क तयार आहे.
हेअर मास्क वापरण्याची पद्धत
बटाट्याच्या सालीचा हेअर मास्क लावण्यापूर्वी केस विंचरा. त्यानंतर केसांच्या ब्रशच्या मदतीने तयार केलेला मास्क, केसांच्या मुळांना आणि लांबीला लावा. हा मास्क केसांवर अर्धा तास ठेवा. नंतर आपले केस शॅम्पू आणि कंडिशनरने धुवा. आपण याचा वापर महिन्यातून तीन वेळा करू शकता. यामुळे केसांना आवश्यक पौष्टीक घटक मिळतील. ज्यामुळे केस काळे, व शाईन करतील.