टॅटू काढण्याचे एक सहज सोपे लॉजिक आहे. थोड्याफार वेदना तर होतातच. पण या वेदना कमी करणं मात्र आपल्याला नक्कीच जमू शकतं. म्हणूनच या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी सांगितले आहे की टॅटू काढण्यासाठी तुमच्या शरीराचा मांसल भाग निवडला पाहिजे. ज्या भागावर चरबी अधिक आहे आणि नर्व्ह एंडिंग पॉईंट्स कमी आहेत, त्या भागावर जर टॅटू काढले तर जास्त त्रास होणार नाही. म्हणूनच जर टॅटू काढायचा असेल तर या अवयवांचा विचार नक्की करा.
या भागांवर काढा टॅटू
१. मांडया
मांड्या म्हणजे थाईजवर सगळ्यात जास्त चरबी असते. त्यामुळे टॅटू काढण्यासाठी हा भाग सगळ्यात चांगला आहे, असे सांगितले जाते. मांड्यावर जेव्हा आपण टॅटू काढतो तेव्हा वेदना तुलनेने खूपच कमी जाणवतात. शिवाय टॅटू काढायला जागाही भरपूर असल्याने आकर्षक आणि मोठा टॅटू काढता येतो.
२. दंड
दंडावर काढलेला टॅटू खूपच आकर्षक आणि ट्रेण्डी वाटतो. दंडावर चरबीही असते आणि तिथे खूप जास्त नर्व्ह एंडिंग पॉईंट्स नसतात. त्यामुळे दंड हा देखील टॅटू काढण्यासाठीचा एक उत्तम पर्याय आहे.
३. पोटऱ्या
पोटऱ्या म्हणजेच पायाच्या मागच्या बाजूच्या मांसल भागात टॅटू काढला जाऊ शकतो. टॅटूच्या वेदना खूप होऊ द्यायच्या नसतील तर पोटऱ्यांवर टॅटू काढण्याचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता. याशिवाय जेव्हा शॉर्ट्स आणि मिनी किंवा नी लेन्थ स्कर्ट घातले जातात, तेव्हा पोटऱ्यांवरचे टॅटू खूपच स्टाईलिश आणि ट्रेण्डिंग दिसतात.
४. पाठीचा वरचा भाग
पाठीच्या वरच्या भागात काढलेला टॅटू अतिशय आकर्षक आणि हॉट दिसतो. डीप नेक असलेला कोणताही ड्रेस घातला तरी पाठीवरचा टॅटू उठून दिसतो. डीप नेक असलेला ब्लाऊज घालून साडी नेसली आणि केसांचा हायबन घातला तर पाठीवरचा टॅटू खूपच स्टनिंग लूक देणारा ठरतो. तसेच वेदनाही खूपच कमी हाेतात. त्यामुळे पाठीच्या वरच्या भागावर टॅटू काढायचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता.
५. हिप्स
लग्नाच्या आधी हिप्सवर टॅटू काढून घेण्याचे प्रमाण आजकाल युवतींमध्ये खूप वाढले आहे. टॅटू काढण्यासाठी ही नक्कीच एक चांगली जागा आहे. हिप्स हा शरीराचा एक मांसल भाग असून त्यावर नर्व्ह एडिंग पॉईंट्ससुद्धा कमी असतात. त्यामुळे जर हिप्सवर टॅटू काढायचा विचार करत असाल, तर तुमचा तो विचार योग्यच आहे.