Lokmat Sakhi >Beauty > चॉकलेट खा आणि चेहऱ्यालाही लावा ! १ चमचा कोको पावडर आणेल चेहऱ्यावर चमचमता आनंदी ग्लो...

चॉकलेट खा आणि चेहऱ्यालाही लावा ! १ चमचा कोको पावडर आणेल चेहऱ्यावर चमचमता आनंदी ग्लो...

6 Amazing Homemade Chocolate Face Masks For Flawless Skin : चॉकलेट खाल्ल्याने जसा मूड चांगला होतो तसाच चॉकलेटचं फेसपॅकही चेहरा चमकवतो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2023 03:29 PM2023-08-24T15:29:23+5:302023-08-24T15:50:59+5:30

6 Amazing Homemade Chocolate Face Masks For Flawless Skin : चॉकलेट खाल्ल्याने जसा मूड चांगला होतो तसाच चॉकलेटचं फेसपॅकही चेहरा चमकवतो...

Get That Festive Season Glow With These Cocoa Powder Face Masks. | चॉकलेट खा आणि चेहऱ्यालाही लावा ! १ चमचा कोको पावडर आणेल चेहऱ्यावर चमचमता आनंदी ग्लो...

चॉकलेट खा आणि चेहऱ्यालाही लावा ! १ चमचा कोको पावडर आणेल चेहऱ्यावर चमचमता आनंदी ग्लो...

कोको पावडरचा (Cocoa Powder) वापर आपण आतापर्यंत केक, चॉकलेट, बिस्किट्स, कुकीज असे पदार्थ बनवताना केला असेल. परंतु जर आपल्याला कोणी सांगितले की त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी तसेच सौंदर्य खुलवण्यासाठी आपण कोको पावडरचा वापर करु शकतो, तर यावर आपला विश्वास बसणार नाही. होय, शक्यतो अनेक बेकरी प्रॉडक्ट्समध्ये वापरली जाणारी ही कोको पावडर खरंच आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य खुलवून आणू शकते. आपण आतापर्यंत मोठमोठ्या ब्युटी पार्लरमध्ये गोल्ड, सिल्व्हर, डायमंड, फ्रूट, हर्बल, डी- टॅन असे असंख्य फेशियलचे प्रकार ऐकले असतील. याच सगळ्या फेशियल सोबत आजकाल चॉकलेट फेशियल करून घेण्याची हटके क्रेझ सध्या तरुणी व महिलांमध्ये मोठ्या प्रमाणांवर पाहायला मिळते. 

चाॅकलेटमधे जितक्या जास्त प्रमाणात कोकोआचं (Cocoa Powder) प्रमाण असतं तितकं ते चाॅकलेट परिणामकारक असतं. डार्क चाॅकलेटमध्ये कोकोआ पावडरचं प्रमाण जास्त असतं, म्हणून त्वचेसाठी डार्क चाॅकलेट वापरणं फायदेशीर ठरतं. कोकोआ पावडरमध्ये फ्लेवोनाॅइडस असतं. फ्लेवोनाॅइडसमुए त्वचेतील कोलॅजनची निर्मिती वाढते. यामुळे त्वचा खराब होत नाही. तसेच कोलॅजन वाढलं की त्वचेखाली नवीन पेशींची वाढ व्हायला लागते. चाॅकलेटने चेहऱ्याचा मसाज केल्यास चेहरा चमकतो. त्वचा मऊ मुलायम होते. त्वचेसाठी चाॅकलेट हे फायदेशीर कसं असतं हे समजून घेण्यासोबतच त्वचेसाठी चाॅकलेटचा उपयोग कसा करावा हे माहीत करुन घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे(Get That Festive Season Glow With These Cocoa Powder Face Masks).

कोको पावडरचे विविध फेसपॅक नेमके कसे बनवावे ?

१. कोको पावडर आणि मुलतानी माती :- तेलकट त्वचा असल्यास कोको पावडर आणि मुलतानी माती यांचा एकत्रित फेसपॅक वापरु शकता. त्यात थोडा लिंबाचा रस घालावा. हा मास्क चेहऱ्यास लावल्यास त्याचा फायदा तेलकट त्वचेवरील मुरुम, पुटकुळ्या बऱ्या होण्यासाठी होतो. या मास्कमधील मुलतानी मातीमुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाते आणि लिंबामुळे त्वचा मऊ होते.

फेशियल नेमके किती दिवसांनी करायला हवे? महिन्यातून एकदा केले तर त्वचेला खरंच फायदा होतो?

२. कोको पावडर व दूध :- तेलकट त्वचेपेक्षाही जास्त समस्या त्वचा कोरडी असल्यास निर्माण होतात. कोरड्या त्वचेत ओलावा टिकून ठेवणं हेच मोठं आव्हान असतं. यासाठी कोको पावडरमध्ये थोडं दूध घालून फेसपॅक तयार करावा. चाॅकलेट आणि दुधाच्या या मिश्रणात थोडं मध किंवा ऑलिव्ह ऑइल देखील आपण घालू शकता. दुधात लॅक्टिक ॲसिड असतं. यामुळे चेहऱ्याची त्वचा स्वच्छ होते. मध किंवा ऑलिव्ह ऑइलमुळे त्वचेत आर्द्रता निर्माण होते. दुधाऐवजी आपण नारळाच्या दुधाचा देखील वापर करु शकता. 

१ चमचा सालीची मुगडाळ आणि ५ फेसपॅक, चेहऱ्यावर चमक हवी तर करा १० मिनिटांचा सोपा उपाय...

३. कोको पावडर व काकडी :- कोको पावडर घेऊन त्यात काकडीचा रस किंवा काकडीचा किस घालावा. हा तयार फेसपॅक चेहऱ्याला लावून किमान १५ ते २० मिनिटे तसाच ठेवावा. त्यानंतर धुवून घ्यावा. यामुळे आपली त्वचा ताजीतवानी होईल तसेच त्वचेला चमक येईल.

४. चाॅकलेट- मध- लिंबू :- या चाॅकलेट फेशिअलमध्ये ॲण्टिऑक्सिडण्टसचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या निघून जातात. चेहऱ्यावर डाग दिसत नाहीत.  हे चाॅकलेट फेशियल तयार करताना एका भांड्यात कोकोआ पावडर  घ्यावी. त्यात ३ छोटे चमचे मध आणि थोडा लिंबाचा रस घालावा. ते चांगलं एकजीव करुन चेहऱ्यास लावावे. 

५. चाॅकलेट आणि ओट्स :- एका भांड्यात कोको पावडर घेऊन त्यात ओट्स पावडर आणि शिया बटर घालून हे मिश्रण चांगलं एकजीव करुन घ्यावं. हे मिश्रण चेहेऱ्याला आणि मानेला लावावं. या प्रकारच्या चाॅकलेट फेशिअलमुळे त्वचा स्वच्छ होते, चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते.

चमचाभर गव्हाच्या पिठाची जादू, त्वचा दिसेल यंग व ग्लोइंग ! तजेलदार त्वचेसाठी इन्स्टंट फेसपॅक...

६. चाॅकलेट-खोबऱ्याचं तेल- ब्राऊन शुगर :- हे फेशियल म्हणजे चाॅकलेट स्क्रब आहे. यासाठी एका भांड्यात कोको पावडर घ्यावी. त्यात थोडं खोबऱ्याचं तेल घालावं. आधी कोको पावडर आणि खोबऱ्याचं तेल चांगलं फेटून घ्यावं. ते फेटलं गेलं की त्यात ब्राऊन शुगर घालावी. नंतर पुन्हा हे मिश्रण फेटून घ्यावं. हा लेप चेहऱ्याला हलका मसाज करत लावावा. लावल्यानंतर तो ५ ते ७ मिनिटे ठेवावा आणि नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा.

दुधीची साल फेकून देताय ? दुधीच्या सालींचा बनवा फेसपॅक...चेहऱ्याचे सौंदर्य वाढेल चटकन...

Web Title: Get That Festive Season Glow With These Cocoa Powder Face Masks.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.