Join us  

गुढी पाडव्याला चेहरा सतेज आणि फ्रेश दिसायला हवा? १ चमचा तूप-चिमूटभर हळद- करा खास उपाय आठवडाभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2023 6:12 PM

Ghee Benefits for Skin : Make Facemask and use for Lips चेहरा आणि ओठ मऊ, सुंदर आणि तजेलदार दिसण्याचा खास उपाय

आपण सुंदर, मोहक, आकर्षक दिसावं असं कोणाला नाही वाटत. आपण आपल्या त्वचेची खूप काळजी घेतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. ज्याचा मुख्य फटका आपल्या चेहऱ्यावर होतो. त्वचा काळपट पडते, मुरूम, सन टॅन, यासारख्या समस्या उद्भवतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आपण तुपाचा वापर करू शकता. तुपाचे सेवन केल्याने शरीरात आरोग्यदायी बदल घडतात. यासह चेहऱ्यावर नवे तेज येते.

तुपामध्ये ओमेगा-3, ओमेगा-9 फॅटी अॅसिड आणि जीवनसत्त्वे ए, के, ई यांसारखी पोषक तत्त्वे आढळतात. तुपामध्ये काही गोष्टी मिसळून चेहऱ्यावर लावल्यास अनेक समस्या दूर होतात. तुपात महत्त्वपूर्ण फॅटी अॅसिड असते, जे त्वचेला मॉइश्चरायझ करण्याचे काम करतात, यासह मुरुमांच्या डाग कमी होतात(Ghee Benefits for Skin : Make Facemask and use for Lips).

तुपात मिसळा हळद

तूप चेहऱ्यावर लावण्यासाठी एक कप घ्या, त्या कपात २ चमचे तूप व चिमूटभर हळद आणि बेसन मिसळा. ही पेस्ट २० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. ही प्रक्रिया आठवड्यातून ३ वेळा करा. ज्यांची त्वचा खूप तेलकट आहे, त्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय या उपायाचा अवलंब करू नये.

कोरफडीच्या गरात ५ गोष्टी मिक्स करा आणि पाहा चेहऱ्यावर नितळ जादू ! पिंपल्सचा त्रास कमी..

ओठांसाठी उपयुक्त

ज्यांचे ओठ कोरडे पडले आहेत, त्यांनी तुपात हळद मिसळून ओठांवर लावावे. यामुळे कोरडे ओठ मऊ आणि गुलाबी होतील. यासह ओठ मॉइश्चरायझ होतील.

फेस वॅक्सिंग करतानाच्या वेदना का सहन करता? घरच्याघरी चिमूटभर हळद वापरुन करा वेदनारहित वॅक्सिंग

हळदमधील पौष्टीक घटक

हळदचे अनेक फायदे आहेत. हळदीच्या वापरामुळे त्वचा चांगल्या पद्धतीने एक्सफोलिएट होते. हळदमध्ये व्हिटॅमिन सी, के, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, तांबे, लोह, प्रथिने, फायबर हे पोषक तत्व आढळतात. याशिवाय हळदमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील असतात.

आता घरीच बनवा गुलाबाच्या पाकळ्यांचा लिप बाम, ओठ होतील सुंदर-गुलाबी

तुपामधील पौष्टीक घटक

तुपात ओमेगा-३, ओमेगा-९ फॅटी अॅसिड आणि जीवनसत्त्वे ए, के, ई आढळतात, जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात आणि संसर्गापासून संरक्षण करतात.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी