Lokmat Sakhi >Beauty > आता घरी झटपट बनवा तुपाचं मॉइश्चरायझर, त्वचा इतकी चमकेल की सगळे विचारतील चेहऱ्याला काय लावतेस?

आता घरी झटपट बनवा तुपाचं मॉइश्चरायझर, त्वचा इतकी चमकेल की सगळे विचारतील चेहऱ्याला काय लावतेस?

Ghee for Dry Skin: Natural Moisturizer for Your Face: Home Remedies for Dry Skin: How to Use Ghee for Soft and Hydrated Skin: Natural Skincare Tips: Ghee for Dry Skin Treatment: Ghee Face Cream for Glowing Skin: Moisturizing with Ghee: शुद्ध तुपापासून बनवलेला मॉइश्चरायझर आपल्या त्वचेला आतून निरोगी बनवते. हा मॉइश्चरायझर कसा बनवायचा पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2025 16:40 IST2025-03-20T16:39:32+5:302025-03-20T16:40:03+5:30

Ghee for Dry Skin: Natural Moisturizer for Your Face: Home Remedies for Dry Skin: How to Use Ghee for Soft and Hydrated Skin: Natural Skincare Tips: Ghee for Dry Skin Treatment: Ghee Face Cream for Glowing Skin: Moisturizing with Ghee: शुद्ध तुपापासून बनवलेला मॉइश्चरायझर आपल्या त्वचेला आतून निरोगी बनवते. हा मॉइश्चरायझर कसा बनवायचा पाहूया.

ghee moisturizer tips for dry skin face try this natural cream skin care home remedies | आता घरी झटपट बनवा तुपाचं मॉइश्चरायझर, त्वचा इतकी चमकेल की सगळे विचारतील चेहऱ्याला काय लावतेस?

आता घरी झटपट बनवा तुपाचं मॉइश्चरायझर, त्वचा इतकी चमकेल की सगळे विचारतील चेहऱ्याला काय लावतेस?

उन्हाळा असो किंवा हिवाळा आपल्या त्वचेची योग्य काळजी घेणे खूप गरजेचे आहे.(Ghee for Dry Skin) त्वचा सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक प्रकारचे महागडे उत्पादने वापरतो. त्वचा कोणतीही असली तरीही ती हायड्रेट राहाणे गरजेचे असते. (Natural Moisturizer for Your Face) कोरड्या त्वचेसाठी मॉइश्चरायझर हा एक उत्तम पर्याय मानला जातो. ज्यामुळे त्वचा हायड्रेट होण्यास मदत होते. कोरड्या त्वचेमुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. (Home Remedies for Dry Skin)
चेहऱ्यासाठी मॉइश्चरायझर निवडताना आपला अनेकवेळा गोंधळ उडतो. रसायनयुक्त असणारे मॉइश्चयराझर त्वचेसाठी हानिकारक ठरतात.(How to Use Ghee for Soft and Hydrated Skin) जर आपली ही त्वचा अतिसंवेदनशील, कोरडी असेल तर आपण घरच्या घरी मॉइश्चराझर बनवू शकता. (Natural Skincare Tips) शुद्ध तुपापासून बनवलेला मॉइश्चरायझर आपल्या त्वचेला आतून निरोगी बनवते. हा मॉइश्चरायझर कसा बनवायचा पाहूया. 

७ दिवसांत केसगळती होईल कमी, कोमट पाण्यात मिसळून प्या 'हा' पदार्थ; केस वाढतीलही भरभर

साहित्य

शुद्ध तूप - २ मोठे चमचे
नारळाचे तेल - १ चमचा 
गुलाब पाणी - १ चमचा 
कोरफड जेल - १ चमचा 
व्हिटॅमिन ई कॅप्सूल - १ 
मध - १/२ चमचा 
टी ट्री ऑइल - आवश्यकतेनुसार 

मॉइश्चरायझर कसे बनवाल? 

1. सर्वात आधी मंद आचेवर शुद्ध तूप वितळवून घ्या. थंड होण्यास बाजूला ठेवा. 

2. लहान भांडयात १ चमचा नारळाच्या तेलात कोरफडचा गर घाला. यामध्ये वितवळलेले शुद्ध तूप घाला. हे मिश्रण हलक्या हाताने मिसळा.

3. नंतर यात गुलाबजल आणि मध घाला. आता यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि टी ट्री ऑइलचे काही थेंब घालून मिश्रण एकजीव करा. 

4. मलाईदार क्रीम तयार झाल्यानंतर घट्ट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. 

टाचा होतील मऊ-मुलायम, भेगाही भरुन निघतील; पाहा सोपे घरगुती उपाय, काळवंडलेले पायही गोरे होतील!!


तुपापासून बनवलेले मॉइश्चरायझर 

नारळाचे तेल त्वचेला मॉइश्चरायझ करते. कोरफड त्वचेची जळजळ कमी करते आणि त्वचेला हायड्रेट ठेवते. गुलाब पाण्यात त्वचेला थंड करते आणि मध त्वचा मऊ करण्यास मदत करते. व्हिटॅमिन ई मध्ये अँटीऑक्सिडंट असते जे आपल्या त्वचेची वृद्धत्व प्रक्रिया मंदावते. जे त्वचेसाठी फायदेशीर आहे त्यात अँटी - बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. 

कसे वापराल?

1. आपली त्वचा पूर्णपणे धुतल्यानंतर हे तूप मॉइश्चयराझर त्वचेवर लावा. 

2. हलक्या हाताने मालिश करा ज्यामुळे ते पूर्णपणे     शोषले जाईल. 

3. हे दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या त्वचेवर लावू शकता. यामुळे त्वचा पूर्णपणे हायड्रेटेड आणि मॉइश्चरायझर राहिल. 

 

Web Title: ghee moisturizer tips for dry skin face try this natural cream skin care home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.