Lokmat Sakhi >Beauty > तूप लावून खरंच येईल रूप! ५ सोपे उपाय, चेहऱ्याला लावा तूप आणि पाहा जादू..

तूप लावून खरंच येईल रूप! ५ सोपे उपाय, चेहऱ्याला लावा तूप आणि पाहा जादू..

Ghee Beauty Hacks तुपाचा वापर केल्यास त्वचेच्या अनेक समस्या दूर राहतात. विशेषत: रात्री तूप लावून झोपल्याने चेहऱ्यावर अनेक फायदे होतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2022 05:00 PM2022-12-05T17:00:36+5:302022-12-05T17:02:15+5:30

Ghee Beauty Hacks तुपाचा वापर केल्यास त्वचेच्या अनेक समस्या दूर राहतात. विशेषत: रात्री तूप लावून झोपल्याने चेहऱ्यावर अनेक फायदे होतात.

Ghee will give beautiful look! 5 Simple Remedies, Apply ghee on your face and see the magic... | तूप लावून खरंच येईल रूप! ५ सोपे उपाय, चेहऱ्याला लावा तूप आणि पाहा जादू..

तूप लावून खरंच येईल रूप! ५ सोपे उपाय, चेहऱ्याला लावा तूप आणि पाहा जादू..

तुपाचा वापर प्रत्येक घरात केला जातो. तूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यातील गुणधर्म चेहरा तुकतुकीत आणि तजेलदार बनवतात. तुपात ओमेगा-3, ओमेगा-9 फॅटी अॅसिड, जीवनसत्त्वे ए, के, ई सारख्या पोषक तत्त्वे आढळतात. हिवाळ्यात तुपाचे अधिक सेवन केल्याने शरीर सुदृढ राहते. तुपाचा वापर केल्यास त्वचेच्या अनेक समस्या दूर राहतात. विशेषत: रात्री तूप लावून झोपल्याने चेहऱ्यावर अनेक फायदे होतात. आज आपण तूप चेहऱ्यावर लावण्याचे उत्तम फायदे जाणून घेऊयात.

चेहऱ्याचा रंग उजळतो

रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर तूप लावल्याने रंगात बदल होतो. डेड स्किन असो, या चेहऱ्यावरील काळपटपणा तूप नियमित लावल्याने चेहरा उजलेळ. आणि लवकर फरक जाणवेल.

फाटलेल्या ओठांसाठी उपयुक्त

हिवाळ्यात फाटलेल्या ओठांच्या समस्येमुळे खूप त्रास सहन करावा लागतो. अशा स्थितीत रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर तूप लावा. यामुळे ओठ मऊ होतील.

सुरकुत्या कमी होतील

तुपात ओमेगा-३ फॅटी ऍसिड असते. जे सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. तूप त्वचेच्या छिद्रांमध्ये आर्द्रता भरते आणि कोलेजन वाढवते, ज्यामुळे तुम्हाला सुरकुत्या पडत नाहीत. 

रक्त परिसंचरण सुधारेल

चेहऱ्याच्या रक्ताभिसरणामुळे त्वचेची चमक वाढण्यास आणि अनेक समस्यांपासून संरक्षण करण्यास मदत होते. चेहऱ्यावर देसी तूप लावून काही वेळ मसाज करा. असे केल्याने चेहऱ्याचे रक्ताभिसरण सुरळीत होते आणि चेहऱ्याची चमक वाढते.

कोरड्या त्वचेवर प्रभावी

हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निस्तेज पडते. कोरड्या त्वचेच्या समस्येवर देसी तूप लावल्याने खूप फायदा होतो. हे त्वचेचा पोत सुधारण्यास आणि आतून पोषण देण्यास मदत करते.

Web Title: Ghee will give beautiful look! 5 Simple Remedies, Apply ghee on your face and see the magic...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.