लांबसडक, काळेभोर केस सगळ्यांनाच हवेहवेसे वाटतात. पण सध्याच्या जीवनशैलीत लांब केस मिळवणं वाटतं तितकं सोपं नाही. आजकाल प्रत्येकजण केस गळणं कमी करण्यासाठी उपायांच्या शोधात असतो. कामाचा ताण, जेवणाच्या वेळा चुकणं, खाण्यापिण्यातील बदल, अनियमितता, पोषक घटकांचा अभाव यामुळे इच्छा असूनही केस चांगले वाढवता येत नाहीत.
सध्या सोशल मीडियावर एका तरूणीच्या केसांचा फोटो व्हायरल होत आहे. इतके लांब केस तुम्ही याआधी कधीही पाहिले असतील. या मुलीच्या केसांची लांबी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. लांब केसांमुळे चर्चेत असलेल्या या मुलीचं नाव आकांक्षा यादव आहे. आकांक्षाच्या केसांची लांबी ९ फूट १०.५ इंच म्हणजेच ३ मीटर आहे. यामुळेच तिच्या नावाचा लिम्बा बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्स २०२०-२०२२ मध्ये समावेश करण्यात आला आहे. लांब केसांची काळजी घेणं प्रत्येकालाच जमतं असं नाही.
२०१९ पासून तिचा रेकॉर्ड आतापर्यंत कोणीही मोडलेला नाही. आकांक्षा यादव ठाण्याची रहिवासी आहे. ती नेहमीच इंस्टाग्रामवर आपल्या केसांचे व्हिडीओज आणि फोटो शेअर करत असते. इंस्टाग्रामवर तिचे १३ हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. आकांक्षाच्या म्हणण्यानुसार लांब केसांचा नॅशनल रेकॉर्ड कायम ठेवणं तिच्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे.
आपल्या लांब केसांमुळे तिनं फार्मास्यूटिकल एंड मॅनेजमेंट प्रोफेशनलच्या इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड्समध्ये नाव मिळवलं आहे. आकांक्षा कधीच आपल्या मोठ्या केसांचे सिक्रेट सांगतात नाही. आपले जमिनीपर्यंत पोहोचणाऱ्या केसांबाबत ती फक्त एव्हढचं सांगते की, 'ती हेअर वॉश आणि हेअर केअरसाठी दिवसातून २० मिनिटांपेक्षा जास्तवेळ लावत नाही. तिच्या म्हणण्यानुसार कमरेपासून जमिनीपर्यंत पोहोचलेल्या केसांना अनेकदा कापलं आहे.