Lokmat Sakhi >Beauty > ग्लो इन द डार्क हेअर : केसांत रंग भरणारा एक खास बोल्ड ट्रेण्ड.

ग्लो इन द डार्क हेअर : केसांत रंग भरणारा एक खास बोल्ड ट्रेण्ड.

रंगबिरंगी दिवस आहेतच, या दिवसात जगण्यात काही विशेष बोल्ड रंग भरायचे असतील तर हायलायटरचा हा प्रकार  करुन पाहता येऊ शकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:12 PM2021-03-29T16:12:06+5:302021-03-29T17:19:56+5:30

रंगबिरंगी दिवस आहेतच, या दिवसात जगण्यात काही विशेष बोल्ड रंग भरायचे असतील तर हायलायटरचा हा प्रकार  करुन पाहता येऊ शकेल

Glow in the Dark Hair: A special bold trend for hair color. | ग्लो इन द डार्क हेअर : केसांत रंग भरणारा एक खास बोल्ड ट्रेण्ड.

ग्लो इन द डार्क हेअर : केसांत रंग भरणारा एक खास बोल्ड ट्रेण्ड.

Highlightsसगळ्यात सोपा पर्याय म्हणजे सोबर कलरची एक बट, ती ही कानाच्या जवळची हायलाइट करुन पहावी,ती आवडली तर मग अधिक पुढचे पर्याय निवडावेत.

-श्रावणी बॅनर्जी

आपल्या दिसण्यात केसांची भूमिका खूप महत्त्वाची असते. पण या रंगांच्या मौसमात सध्या एक खास ट्रेण्ड आहे. तसा तो नेहमी असतो चर्चेत पण आता बसंत-बहारचे दिवस आहेत तर या ट्रेण्डची आठवण काढायलाच हवी.
ग्लो इन द डार्क हेअर .म्हणजे काय तर, आपले केस काळे असोत की तपकिरी असोत किंवा पांढरे असले तरी चालतील.
त्या केसात हायलायटिंग करुन घेण्याची फॅशन आहेच. आता हा ग्लो त्याच्या पुढचा. म्हणजे केसातली एकच एक बट हायलाइट करुन घ्यायची. किंवा माथ्यावरचा वर्तुळाकृती भाग हायलाइट करायचा. केसांची फक्त टोकं हायलाइट करायची. फ्लिक्स कापून फक्त तेवढेच हायलाइट करायचे/ किंवा भांग पाडतो तसे निम्मे केस हायलाइट करायचे.
असं काहीही.
पण ते केस हायलाइट करताना जे रंग वापरले जाताहेत, तो म्हणजे हा ग्लो.
म्हणजे शब्दश: कुठलाही म्हणजे आपल्याला आवडेल तो कुठलाही रंग त्यासाठी वापरला जातो. पण यात आघाडीवर आहेत ते लाल, पिवळा, जांभळा,निळा हे रंग.


केस कलर करुन घेण्याचा हा ट्रेण्ड हा सण उत्सवांच्या काळात प्रामुख्याने दिसतो.
मात्र यात एक धोकाही आहेच. अनेकजणी हौशीनं केस हायलाइट करवून घेतात. काही दिवस ते सारं मस्त वाटतं. आपला बोल्ड लूक कॅरी करणं हे हिमतीचंही वाटतं. मात्र भावनेच्या भरात कलर केलेले हे केस काही दिवसातच काहीजणींना नकोसेही होतात.
कारण काय? तर त्यांना वाटतं की, हायलाइट करताना जो रंग वापरला त्याचा चॉईस चुकला. आपल्या स्किन टोनला हा रंग सूट होत नाही. जरा जास्तच बोल्ड झालंय प्रकरण किंवा अतीच गॉडी दिसतंय असं काहीही वाटू लागतं.
अर्थात या वाटण्याला तसा काही आधार नसतो. कारण हे सगळे भावनिक चढउतार असतात.
पण आपले केस आपण ज्या रंगात रंगवतो आहोत तो रंग निदान पुढचं वर्षभर तरी आपल्याला आवडेल याची खात्री बाळगता यायला हवी, नाहीतर केसांवर ग्लो दिसतो पण चेहऱ्यावरचा उडतो असेही काही अनुभव आहेत.
त्यामुळे हायलाइट करताना ठरवायला हवं की, आपण जी बट हायलाइट करणार ती आपल्याला कॅरी करता येणार आहे का?
त्यामुळे लाल-हिरवा-निळा-केशरी अशा भडक रंगात केस हायलाइट करण्यापूर्वी चॉकलेटी, तपकिरी, ब्राऊनच्य अनेक शेड्स यांचा विचार करा.
 एका आड एक बट हायलाइट करण्याची सध्या फॅशन आहे, पण त्यानं खूप डार्क लूक येऊ शकतो, तो आपल्याला आवडेल का? हे आधी तपासा.
सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे सोबर कलरची एक बट, ती ही कानाच्या जवळची हायलाइट करुन पहावी,ती आवडली तर मग अधिक पुढचे पर्याय निवडावेत.
 

Web Title: Glow in the Dark Hair: A special bold trend for hair color.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.