दिवाळी सुरु झाल्यानंतर खरेदी, फराळ, साफसफाईची लगबग सुरु होते. या दिवसात काम करून महिलांचा पिट्ट्या पडतो. शिवाय त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यामुळे ऐनदिवाळीत चेहऱ्यावरील चमक कमी होते. शिवाय मुरुमांच्या डागांमुळे चेहरा अधिक खराब दिसतो.
जर दिवाळीत सुंदर डागरहित चेहरा हवा असेल तर, बटाट्याचा वापर करून पाहा. यातील दाहक-विरोधी गुणधर्म, झिंक आणि व्हिटॅमिन सीमुळे चेहरा क्लिन होतो, शिवाय टॅनिंग देखील दूर होते. दिवाळी हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, आपण आतापासूनच बटाट्याचा सोपा उपाय करून पाहिलात तर नक्कीच चेहरा उजळेल. चेहऱ्यावर बटाट्याचा वापर कसा करावा? पाहा(Glow like a diya this Diwali with just one Potato).
चेहऱ्यावर बटाट्याचा रस लावण्याचे फायदे
त्वचेवर सुंदर ग्लो हवं असेल तर, बटाट्याच्या रसाचा वापर करून पाहा. बटाट्यातील अँटी-ऑक्सिडंट टॅनिंग, काळे डाग कमी करतात. शिवाय व्हिटॅमिन सी चे गुणधर्म त्वचेमध्ये कोलेजन तयार करतात. जे चेहऱ्यावरील वृद्धत्वाची लक्षणं कमी करतात. चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवं असेल तर, बटाटा किसून त्यातील रस काढा, तयार रसात कॉटन बॉल बुडवून चेहऱ्यावर लावा. १० ते १५ मिनिटानंतर चेहरा सामान्य पाण्याने धुवा.
बटाटा-काकडीचा रस
चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग कमी करण्यासाठी आपण बटाटा-काकडीच्या रसाचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीत बटाटा-काकडीचा रस मिक्स करा. दोन्ही गोष्टींचा रस समान प्रमाणात मिसळा, नंतर चेहऱ्यावर लावा. २० मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवा. आपण हा उपाय आठवड्यातून २ वेळा करू शकता. यामुळे डार्क सर्कल देखील कमी होतील.
बटाट्याचा रस - मध
कोरड्या त्वचेवर चमक आणण्यासाठी आपण बटाट्याचा रस आणि मधाचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीत २ चमचे बटाट्याचा रस घ्या, त्यात २ चमचे मध मिसळा. १५ मिनिटांसाठी चेहरा आणि मानेवर लावून ठेवा. नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
साफसफाई, शॉपिंग, फराळ या कामांमुळे चेहरा डल दिसतोय? ४ घरगुती उपाय, ऐन दिवाळीत चेहरा करेल ग्लो
बटाट्याचा रस आणि दूध
चेहऱ्यावरील धूळ, माती, प्रदुषणामुळे साचलेली घाण काढण्यासाठी आपण बटाट्याचा रस आणि दुधाचा वापर करू शकता. दूध क्लिंजर म्हणून काम करते. यामुळे चेहरा क्लिन होतो. यासाठी एका वाटीत २ चमचे बटाट्याच्या रसात २ चमचे दूध घालून मिक्स करा. आपण त्यात काही थेंब ग्लिसरीनचे देखील घालून मिक्स करू शकता. तयार रस १५ मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा. नंतर पाण्याने चेहरा धुवा.