काल्पनिक गोष्टींमध्ये किंवा काही पौराणिक कथांमध्ये आपण नेहमीच ऐकत आलेलो आहोत की अमूक एका व्यक्तीला तरुण राहण्याचं वरदान मिळालेलं असतं. त्यामुळे त्या व्यक्तीचं सौंदर्य अगदी म्हातारपणीही कायम राहातं. किंवा एखाद्या कुरूप मुलीला एखादा वर मिळतो आणि तिचं रुपांतर अतिशय सुंदर अशा राजकन्येत होतं... काल्पनिक वाटणारी ही गोष्ट आता प्रत्यक्षात होत आहे. शिवाय हे वरदान आताच्या या अधुनिक जगात कोणालाही मिळू शकतं (Glutathione injection for skin repairing). त्या वरदानाचं नाव आहे ग्लुटाथिऑन (new trend in beauty world)... सौंदर्याच्या दुनियेत सध्या धुमाकूळ घालणारा हा नवा ट्रेण्ड नेमका काय, ते पाहा...(use of glutathione injection for skin lightening)
त्वचा नेहमीच तरुण ठेवण्यासाठी तसेच त्वचेवरच्या सुरकुत्या दिसू नयेत यासाठी सेलिब्रिटी बोटोक्स करतात हे आपल्याला माहिती आहे. आता त्यातच ग्लुटाथिऑन या ब्यूटी ट्रिटमेंटची भर पडली आहे. आपल्या त्वचेचं तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी काही ॲण्टऑक्सिडंट्स खूप महत्त्वाचे असतात.
क्रिती सेनन सांगते तसं कॉफीमध्ये तूप टाकून प्यायल्याने खरंच वजन कमी होतं? तज्ज्ञ सांगतात....
हे ॲण्टीऑक्सिडंट्स आपल्या त्वचेला ग्लुटाथिऑन या इंजेक्शनच्या माध्यमातून दिले जातात. ग्लुटाथिऑन नावाचं हे इंजेक्शन ॲमिनो ॲसिड, ग्लुटामाईन आणि ग्लायसिन या घटकांपासून तयार केलेलं असतं. हे इंजेक्शन घेतल्याने त्वचा उजळ होते, तसेच त्वचेवर सुरकुत्या, पिगमेंटेशन असे काहीही होत नाही. त्वचा नेहमीच तरुण आणि सुंदर राहाते.
theprint.in यांना डॉ. दिपाली भारद्वाज यांनी दिलेल्या माहितीनुसार एका ग्लुटाथिऑन इंजेक्शनची किंमत ६ हजार ते १२ हजार रुपये यादरम्यान असते. तुमच्या त्वचेच्या गरजेनुसार आणि तुमच्या वजनानुसार त्याचे किती डोस घ्यावे लागतील, हे डॉक्टर सांगतात.
खाऊन पाहिली का तुम्ही कधी गुलाबजामची भजी? बघा गुलाबजामची कशी लावली वाट- व्हिडिओ व्हायरल
पण या औषधांचा परिणाम किडनीवरही होऊ शकतो. त्यामुळे या इंजेक्शनचे ८ ते १० शॉट्स झाल्यानंतर नियमितपणे किडन्यांची तपासणी करून घ्यावी. सौंदर्यापायी आरोग्याचा असा धोका पत्करण्यापेक्षा आपण जसे आहोत, तसेच स्वत:ला स्वीकारून आनंदाने, समाधानाने नाही राहू शकत का? कारण तुमचं आरोग्यच उत्तम नसेल तर सौंदर्य काय कामाचं...