ऋतू कोणताही असो आपल्याला आपल्या त्वचेची काळजी ही घ्यावीच लागते. प्रत्येक ऋतूनुसार आपण आपले स्किन केअर रुटीन बदलत असतो. शक्यतो, आपण कोरड्या आणि निर्जीव त्वचेची विशेष काळजी घेण्यासाठी अनेक घरगुती उपाय करून पाहतो. त्याचवेळी, त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी ग्लिसरीनचा वापर देखील आवर्जून करतो.
खरं तर ग्लिसरीन त्वचेसाठी नैसर्गिक क्लिनिंग एजंट म्हणून काम करते. त्यामुळे अनेक कॉस्मेटिक आणि सौंदर्य उत्पादनांमध्ये ग्लिसरीनचा भरपूर वापर केला जातो. त्याचवेळी, आपण थेट त्वचेवर ग्लिसरीन देखील लावू शकतो. आपल्या त्वचेसाठी ग्लिसरीन वापरण्याचे असंख्य फायदे असले, तरीही ते चुकीच्या पद्धतीने लावल्याने त्वचेवर जळजळ, खाज, लालसरपणा आणि इंन्फेक्शन अशा असंख्य लहान - मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. ग्लिसरीन हे त्वचेसाठी सर्वोत्तम मॉइश्चरायझिंग एजंट मानले जाते. अशा परिस्थितीत, ग्लिसरीन वापरून आपण केवळ त्वचेची आर्द्रता राखू शकत नाही तर मुरुम आणि डागांच्या समस्येला देखील दूर करु शकतो(Glycerin for skin: Here’s everything to know about this wonder ingredient).
ग्लिसरीनमध्ये मिसळा ४ नैसर्गिक गोष्टी आणि त्वचेत दिसणारा फरक बघा...
१. गुलाबपाणी व ग्लिसरीन :- गुलाबपाणी आणि ग्लिसरीनच्या मदतीने आपल्याला त्वचेच्या ड्रायनेसपासून सुटका मिळू शकते. त्यासाठी ग्लिसरीनमध्ये गुलाबपाणी मिसळून हा तयार झालेला फेसपॅक चेहऱ्यावर लावा. हे फेसपॅक चेहऱ्याला लावल्यानंतर तो १० ते १५ मिनिटे किंवा पूर्णपणे सुकेपर्यंत चेहऱ्यावर तसाच ठेवावा. काही वेळानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव. हा उपाय केल्यास आपल्या चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येईल.
साखर-कॉफी-कोरफड-हळद-लिंब, ५ जादूई गोष्टी-काळवंडलेली मान होईल एकदम स्वच्छ...
२. मुलतानी माती आणि ग्लिसरीन :- त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी आपण मुलतानी माती आणि ग्लिसरीनचा वापर करु शकता. यासाठी मुलतानी मातीमध्ये ग्लिसरीन मिसळून चेहऱ्याला लावा आणि नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. त्वचेवरील काळे डाग आणि ब्लॅक स्पॉट्स दूर करण्यासाठी मुलतानी माती आणि ग्लिसरीन अतिशय उपयुक्त ठरते. या फेसपॅकमुळे त्वचेचा तजेलदारपणा व फ्रेशनेस कायम टिकून राहील.
नाकातील केस काढावे का? संसर्ग होण्याचा गंभीर धोका, नाक सांभाळा, फॅशनच्या नावाखाली जीवाशी खेळ...
३. मध आणि ग्लिसरीन :- आपल्या त्वचेसाठी आपण ग्लिसरीनचा वापर अनेक प्रकारे करु शकतो. मध आणि ग्लिसरीनचा वापर करून आपण पिगमेंटेशनपासून स्वतःच्या त्वचेचा बचाव करु शकतो. त्याचवेळी, मुरुम आणि मुरुमांपासून मुक्त त्वचा मिळवण्यासाठी ग्लिसरीन आणि मधाचा वापर हा सर्वोत्तम पर्याय आहे. मध आणि ग्लिसरीन यांच्या एकत्रित फेसपॅकने त्वचेची चमक टिकून राहण्यास मदत होते.
केसांना मेहेंदी लावताना त्यात मिसळा १ सिक्रेट गोष्ट, केसांवर मेहेंदीचा रंग टिकेल भरपूर दिवस
४. लिंबू आणि ग्लिसरीन :- त्वचेची खाज, बॅक्टेरिया आणि कोरडेपणा दूर करण्यासाठी आपण लिंबू आणि ग्लिसरीनची मदत घेऊ शकता. यासाठी ग्लिसरीनमध्ये लिंबाचा रस मिसळून चेहऱ्याला लावा आणि काही वेळाने चेहरा पाण्याने धुवून स्वच्छ करा. यामुळे आपला चेहरा अधिक चमकदार आणि त्वचेवरील काळे डाग निघून जाण्यास मदत होईल.
चमचाभर गव्हाच्या पिठाची जादू, त्वचा दिसेल यंग व ग्लोइंग ! तजेलदार त्वचेसाठी इन्स्टंट फेसपॅक...