काळ्या रंगासोबत कोणताही रंग सहज मॅच होत असला तरी लाल आणि गोल्डन (black and golden combination) हे दोन रंग जेव्हा काळ्या रंगासोबत येतात तेव्हा ते कॉम्बिनेशन जबरदस्त हिट ठरतं... असंच काहीसं झालं आहे, सारा अली खानने घातलेल्या लेहेंग्याचं... साराने तिच्या या लेहेंग्याचे फोटो नुकतेच इन्स्टाग्रामवर (instagram) शेअर केले होते.. शेअर करताच साराच्या या लेहेंग्याची चर्चा सोशल मिडियावर (social media) सुरू झाली.
अतरंगी रे (Atrangi re) या आगामी चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त सारा सध्या चांगलीच बिझी आहे.. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी साराने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळीही तिने हाच लेहेंगा घातला होता... सध्या तसंही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सारा जिथे जाते तिथे ती या चित्रपटातील चका चक (chaka chak song of Sara Ali Khan ).. या गाण्यावर ठेका धरते.. त्यामुळे सध्या सारा या गाण्यावर शोभेल असा ट्रॅडिशनल लूक (traditional look of Sara Ali Khan ) करण्यास प्राधान्य देत आहे...
तर साराचा हा जाे गोल्डन ब्राऊन लेहेंगा आहे तो सेलिब्रिटी डिझायनर मनिष मल्होत्रा (Manish Malhotra) यांनी डिझाईन केला आहे. मनिष मल्होत्रा यांनी देखील साराच्या या लेहेंग्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले असून त्याला ensures a golden discovery at every geometric turn... असे कॅप्शन दिले आहे... साराचा हा लेहेंगा जॉमेट्रिक पॅटर्नचा आहे अशी चर्चा आहे. geometric पॅटर्न लेहेंगा म्हणजे या लेहेंग्यावर जे आकार किंवा डिझाईन्स आहेत ते geometric प्रकारचे किंवा भुमितीमधील आकृत्यांसारखे दिसणारे आहेत. पाने, फुले अशी कोणतीही नक्षी यावर नाहीत.
हा लेहेंगा पुर्णपणे काळ्या रंगाचा असून त्यावर गोल्डन सिक्विन आर्ट (sequein art) आणि बिड्स लावून सजवण्यात आलं आहे. सिक्विन्स लावताना ते जॉमेट्रिक आकार लक्षात घेऊन त्यानुसारच लावले गेले आहेत. लेहेंग्याचं ब्लाऊज (blouse and choli) पुर्णपणे काळ्या रंगाचं आहे... हा लेहेंगाच एवढा सुंदर आहे की साराला लेहेंगा घातल्यानंतर त्यावर खूप काही दागिने घालण्याची गरजच पडलेली नाही. काळ्या आणि गोल्डन रंगाचे कानातले झुमके आणि त्याच रंगाची अंगठी एवढ्या कमी ॲक्सेसरीज घालूनही सारा या लूकमध्ये जबरदस्त कॅची (stunning, trendy look of Sara Ali Khan) दिसत आहे.