Join us  

साफसफाई, शॉपिंग, फराळ या कामांमुळे चेहरा डल दिसतोय? ४ घरगुती उपाय, ऐन दिवाळीत चेहरा करेल ग्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2023 12:35 PM

Goodbye dull skin: 4 simple home remedies to rejuvenate your skin : दिवाळीत चेहऱ्याची घ्या अशी काळजी, ऐन दिवाळीत दिसाल सुंदर-फ्रेश

आता काही दिवसांवर दिवाळी हा सण येऊन ठेपला आहे. साफसफाई, मिठाई, फराळ, खरेदी, रोषणाई, या सगळ्या गोष्टींची तयारी करण्यात आपण पूर्णपणे गळून जातो. स्वतःसाठी वेळ मिळतच नाही. ज्यामुळे ऐन दिवाळीत आपला चेहरा थकलेला दिसतो. चेहऱ्यावरील ग्लो काही अंशी कमी होतो.

स्वच्छता, सजावट, पदार्थ तयार करण्यात जरी आपण व्यस्त असलात तरी, स्वतःसाठी वेळ काढून स्किनची योग्य काळजी घ्या. दिवाळीत आपली त्वचा निस्तेज, निर्जीव व थकलेली दिसू नये असे वाटत असेल तर, ४ प्रकारच्या स्किन रुटीन फॉलो करायला विसरू नका. यामुळे सणाच्या दिवशी आपली त्वचा तुकतुकीत तजेलदार दिसेल, यात शंका नाही(Goodbye dull skin: 4 simple home remedies to rejuvenate your skin).

क्लिंजर

दिवाळी जवळ आल्यानंतर आपण घराची सफाई करतो. यामुळे चेहरा धुळीमुळे अधिक खराब होतो. शिवाय थंडीचाही महिना आहे. ज्यामुळे चेहरा ड्राय-रफ होते. ऐन दिवाळीत चेहरा ग्लो करावा असे वाटत असेल तर, स्किन क्लिंजरने क्लिन करा. नंतर चेहऱ्यावर गुलाब जल लावा. यामुळे स्किन मुलायम होईल.

दिवाळीत चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो, फक्त रात्री झोपण्यापूर्वी कच्च्या दुधात 'ही ' चिमुटभर गोष्ट घालून लावा..

सनस्क्रीन

कोणताही महिना असो, नेहमी स्किनवर सनस्क्रीन लावायला विसरू नका. धुळीमुळे स्किन डॅमेज होते. त्यामुळे स्किनवर नेहमी सनस्क्रीन लावून कव्हर करा. यामुळे स्किन हेल्दी दिसेल. शिवाय स्किनचा पीएच लेव्हल देखील बिघडणार नाही.

मध

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी मधाचा वापर करा. मध प्रदुषणापासून स्किनचे संरक्षण करते. मधात अनेक प्रकारचे अँटी-बॅक्टेरियल घटक आढळतात, जे त्वचेची दुरुस्ती करण्यास मदत करतात. त्यामुळे दिवाळीच्या काळात त्वचेवर मध लावून मसाज करा. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येईल.

केस अकाली पांढरे झालेत? हेअर डाय-मेहेंदीचं झंझट सोडा, फक्त खोबरेल तेलात २ गोष्टी मिसळून लावा, मग बघा जादू

होममेड फेसमास्क

दिवाळी साफसफाई यासह इतर कारणांमुळे खूप धावपळ होते. ज्यामुळे चेहऱ्यावर थकवा दिसून येतो. चेहऱ्यावर टवटवीत दिसावे असे वाटत असेल तर, घरगुती फेसमास्कचा वापर करा. यासाठी एका वाटीत एक चमचा मध, एक चमचा गुलाबजल आणि एक चमचा दूध पावडर घेऊन साहित्य मिक्स करा. तयार पेस्ट चेहऱ्यावर १० मिनिटांसाठी लावून ठेवा. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

टॅग्स :दिवाळी 2023त्वचेची काळजीब्यूटी टिप्स