हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा निर्माण होणे सामान्य बाब आहे. थंड वातावरणामुळे बऱ्याचदा टाळूवरील त्वचा कोरडी पडते. टाळूवरील ओलावा संपून जातो. याचा थेट परिणाम केसांवर होतो. या कोंड्यामुळे डोक्यावर कधी खाज सुटते, तर कधी लाल ओरखडे उठतात. कोंड्यामुळे डोक्यावरील त्वचेवर फंगस तयार होते. जे तेलकट भागावर चिकटून राहते. जर डोक्यात सतत खाज येत असेल आणि आपण सतत डोकं खाजवत असाल आणि त्यानंतर आपल्या अंगावर पांढरा कोंडा पडत असेल तर ही कोंड्याची लक्षणं आहेत. जर आपल्याला कोंडा डोक्यावरून घालवायचा असेल तर,घरगुती उपायांचा वापर करून कोंडा दूर करू शकता.
एलोवेरा जेल
एलोवेरा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. कोरफड आपल्या त्वचेचीच नाही तर, टाळूचे आरोग्य राखण्यास देखील मदत करते. सर्वप्रथम एलोवेरा जेल घ्या, त्यात लिंबूचा रस आणि ग्लीसरीन टाका. हे मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्या. आता हे मिश्रण डोक्यावर लावा, आणि दहा मिनिटे चांगले मसाज करा. पंधरा मिनटे हे मिश्रण डोक्यावर ठेवा. शेवटी कोमट पाणी व केमिकल फ्री शॅम्पूने डोकं धुवून घ्या. ही प्रक्रिया आठवड्यातून दोन वेळा करा. जेणेकरून लवकर रीजल्ट दिसेल.
मेथी दाणे
मेथी दाणेचे फायदे अनेक आहेत. आपण केसांच्या आरोग्यासाठी देखील वापरू शकता. एक वाटी दही घ्या त्यात 1 चमचा मेथी दाणे आणि 1 चमचा त्रिफळा पावडर घालून रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी हा मास्क एक तास लावून ठेवा आणि नंतर सौम्य शॅम्पूने धुवा. आपण हा मास्क आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वापरू शकता.
खोबरेल तेल
केसांची निगा राखण्यासाठी खोबरेल तेल उत्तम आहे. केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी खोबरेल तेल खूप महत्वाचे आहे. एका वाटीत खोबरेल तेल घेऊन ते 2 मिनिटे गरम करा. नंतर त्यात 1 चमचा लिंबाचा रस घालून मिक्स करा. हे मिश्रण रात्रभर किंवा आंघोळीच्या आधी 2 तास केसांवर लावा. यानंतर केस सौम्य शाम्पूने धुवा. आपण हा उपाय आठवड्यातून एकदा करू शकता.
ताक आणि त्रिफळा पावडर
ताक जेवण पचवण्यासाठी खूप मदतगार आहे. यासह केसांसाठी देखील किफायतशीर आहे. 2 ग्लास ताकात 1 चमचा त्रिफळा पावडर मिसळा आणि रात्रभर ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी, या औषधी ताकाने आपले केस धुवा आणि नंतर सौम्य शैम्पूचा वापर करा. उत्तम रीजल्टसाठी आपण हा उपाय आठवड्यातून दोनदा वापरू शकता.