स्वयंपाकघरातील पाककृतींसाठी बटाटा हा नेहमीच वापरला जातो. काही लोक कोणत्याही प्रकारच्या भाजी, आमटी, डाळी, इत्यादी पदार्थांमध्ये बटाट्याचा आवर्जून वापर करतात. चवीव्यतिरिक्त बटाट्यामध्ये पोषण तत्त्वांचा खजिना आहे. यामुळे कोणत्याही प्रकारच्या भाजीमध्ये बटाटा मिसळल्यास भाजी अधिक स्वादिष्ट होते. ज्या प्रकारे बटाट्यामुळे स्वयंपाकाची चव वाढते, त्याच प्रमाणे यातील पोषण तत्त्वांमुळे त्वचेचा रंग देखील उजळण्यात मदत मिळते. आपल्या त्वचेवर डाग, मुरुम, सुरकुत्या इत्यादी समस्या निर्माण झाल्या असल्यास उपाय म्हणून कच्च्या बटाट्याचा उपयोग करावा. नियमितपणे हा उपाय केल्यास आपल्या त्वचेमध्ये एका आठवड्यातच सकारात्मक बदल पाहायला मिळतील.
काहीवेळा वाढते प्रदूषण, धूळ, माती यांसारख्या अनेक समस्यांमुळे आपली त्वचा काळवंडते किंवा खराब होऊन त्वचेच्या इतर समस्या देखील उद्भवतात. अशावेळी त्वचेचे सौंदर्य राखण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. याचबरोबर, काहीवेळा आपण इतर महागडी उत्पादन किंवा महागड्या ब्यूटी ट्रिटमेंट्स करून घेतो. परंतु हे सगळे उपाय करण्यापेक्षा स्वयंपाक घरात असणारा बटाटा हा आपल्या त्वचेसाठी सर्वोत्तम उपाय आहे. या बटाट्याचे क्युब्स कसे तयार करावेत व त्याचा वापर कसा करावा हे पाहूयात(Got Pigmentation On Your Face? Try Using These Homemade Potato Cubes).
बटाट्याचे आइस क्युब्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-
१. कच्चा बटाटा - १ मोठा बटाटा
२. दूध - ५ ते ६ टेबलस्पून
३. इसेन्शियल ऑईल - ५ ते ६ थेंब
प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा सांगतात, खास घरगुती फेसपॅक - चमचाभर गव्हाच्या पिठाची जादू...
बटाट्याचे आइस क्युब्स बनवण्याची कृती :-
१. कच्च्या बटाटाच्याचे छोटे - छोटे तुकडे कापून घ्यावेत. आता हे छोटे छोटे तुकडे मिक्सरला लावून त्याची पेस्ट बनवून घ्यावी.
२. आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेली बटाटयाची पेस्ट एका गाळणीत गाळून त्याचे पाणी वेगळे काढून घ्यावे.
३. त्यानंतर या पेस्टमध्ये दूध घालून चमच्याच्या मदतीने सगळे मिश्रण एकजीव करून घ्यावे.
फेशियल नेमके किती दिवसांनी करायला हवे? महिन्यातून एकदा केले तर त्वचेला खरंच फायदा होतो?
४. आता या मिश्रणात इसेन्शियल ऑईलचे ५ ते ६ थेंब घालावेत व पुन्हा एकदा सगळे मिश्रण चमच्याने ढवळून एकजीव करून घ्यावे.
५. आता कच्च्या बटाट्याचे हे मिश्रण तयार आहे, हे मिश्रण चमच्याच्या मदतीने आइस ट्रे मध्ये भरून घ्यावे.
६. हा आइस ट्रे फ्रिजरमध्ये थंड होण्यासाठी ६ ते ७ तास ठेवावा.
बटाट्याचे आइस क्युब्स वापरण्याची कृती :-
१. ६ ते ७ तासानंतर जेव्हा हे आइस क्युब्स संपूर्णपणे बनून तयार होतील. तेव्हा आपण त्यांचा वापर करू शकता.
२. हे बटाट्याचे आइस क्युब्स चेहेऱ्यावर लावण्यासाठी एका सुती कापडात २ ते ३ आइस क्युब्स काढून घ्यावेत.
३. बटाट्याचे आईस क्युब्स लावण्याआधी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.
केळीच्या सालीचा करा फेसपॅक ! पिंपल्स, काळे डाग आणि डार्क सर्कल्स घालविण्याचा सोपा उपाय...
४. बटाट्याचे आईस क्युब्स चेहऱ्यावर हलक्या हातांनी लावावे जोरजोरात घासून रगडू नये.
५. बटाट्याचे आईस क्युब्स चेहऱ्यावर लावल्यानंतर १० ते १५ मिनिटांसाठी ते तसेच ठेवून द्यावे.
६. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.