Lokmat Sakhi >Beauty > केस खूप पिकले, डाय करण्याची भिती वाटते? काळ्याभोर केसांसाठी मेहेंदीत 'हा' पदार्थ मिसळून लावा

केस खूप पिकले, डाय करण्याची भिती वाटते? काळ्याभोर केसांसाठी मेहेंदीत 'हा' पदार्थ मिसळून लावा

Gray Hair Solution : आवळ्यात व्हिटामीन इ असते ज्यामुळे केस गळणं कमी होतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 10:40 AM2023-01-02T10:40:00+5:302023-01-02T13:44:43+5:30

Gray Hair Solution : आवळ्यात व्हिटामीन इ असते ज्यामुळे केस गळणं कमी होतं.

Gray Hair Solution : Home Remedies To Get Rid Of Grey Hair Naturally | केस खूप पिकले, डाय करण्याची भिती वाटते? काळ्याभोर केसांसाठी मेहेंदीत 'हा' पदार्थ मिसळून लावा

केस खूप पिकले, डाय करण्याची भिती वाटते? काळ्याभोर केसांसाठी मेहेंदीत 'हा' पदार्थ मिसळून लावा

आपले केस नेहमी काळेभोर लांब दिसावेत असं प्रत्येकालाच वाटत असतं पण सध्या बिझी लाईफस्टाईलमध्ये केस मेंटेन ठेवणं खूप कठीण झालंय. खाण्यापिण्यातील अनिमियतता,  प्रदूषण, हार्मोनल असंतुलन यामुळे कमी वयातच केस खूपच पिकलेले दिसतात.  अनेकांना डाय करण्याची भिती वाटते. (Hair Care Tips)  कारण डाय केल्यानंतर केस अजून पांढरे होतात असा अनुभव अनेकांना येतो.

कमी वयातच जर तुमचे केस पांढरे झाले असतील आवळ्याचा वापर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. आवळ्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. जे केसांच्या वाढीसाठी आणि नैसर्गिक काळा रंग देण्यासाठी गुणकारी ठरतात. (How to get black hairs naturally)


 

आवळ्याचे केसांना होणारे फायदे

1) आवळ्यात व्हिटामीन इ असते ज्यामुळे केस गळणं कमी होतं.

2) अकाली केस पिकणं प्रतिबंधित करता येते.

3) स्काल्पची त्वचा चांगली राहते. 

4) केस वाढीस चालना मिळते.

आवळ्याचा  रस केसांवर कसा वापरायचा?

सर्व प्रथम 8 ते 10 आवळे घ्या आणि ते पूर्णपणे स्वच्छ करा आणि ग्राइंडरमध्ये धुवा. यानंतर त्यात ४ ते ५ थेंब लिंबाचा रस मिसळा. आता हे मिश्रण केसांना लावून चांगले मसाज करा. एक तासानंतर केस पाण्याने धुवा.

आवळ्याचा हेअरपॅक वापरण्याची योग्य पद्धत

एका भांड्यात दोन चमचे आवळा पावडर आणि दोन चमचे शिककाई घ्या. नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून चांगले मिसळा. आता हे मिश्रण हेअर पॅकप्रमाणे केसांवर आणि टाळूवर लावा. यानंतर अर्धा तास असेच राहू द्या. वेळ संपल्यानंतर केस थंड पाण्याने धुवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमचे केस शॅम्पू देखील करू शकता.

Web Title: Gray Hair Solution : Home Remedies To Get Rid Of Grey Hair Naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.