आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच केस पिकतात. (Turmeric for grey hairs) केस पांढरे झाल्यामुळे अनेकजण हेअर कलर ट्राय करतात पण त्यातल्या केमिकल्समुळे केसांचे अधिकच नुकसान होते. त्यातील केमिकल्सयुक्त घटक केसांना डॅमेज करू शकतात. केस काळे करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा उपाय करू शकता. (Piklele Kes Kale Karnyasathi Upay)
पांढऱ्या केसांना मुळापासून काळे करण्यासाठी काही सोपे उपाय फायदेशीर ठरू शकतात. केसांना काळे करण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता. केसांना काळे करण्यासाठी हळद लाभदायक ठरते. हळदीतील औषधी गुणधर्म केसांना काळे करण्यास मदत करतता. यामुळे केस काळे होण्याबरोबरच ग्लॉसी आणि शायनी होण्यास मदत होते. (How to use turmeric for grey hairs)
हळदीचा नॅचरल डाय कसा तयार करावा? (How to Color Hair at Home Naturally)
हळदीचा नॅचुरल डाय तयार करण्यासाठी तुम्ही एक बाऊलमध्ये एक चमचा हळद आणि २ चमचे आवळा पावडर घालून एकजीव करा. हे दोन्ही पदार्थ लोखंडाच्या कढईत मिसळून व्यवस्थित भाजून घ्या. हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित काळे होईपर्यंत भाजून घ्या. एका भांड्यात थंड झाल्यानंतर काढून ठेवा.
हलवायासारखी खुसखुशीत बालूशाही घरीच करा; फक्त ३ वस्तूंनी बनेल परफेक्ट-रसरशीत बालूशाही
ही पावडर थंड झाल्यानंतर त्यात एलोवेरा जेल घालून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट केसांवर लावून ३० मिनिटांसाठी तसेच ठेवा. नंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आठवड्यातून २ वेळा ही पेस्ट केसांना लावल्यास केस नैसर्गिकरित्या काळे होण्यास मदत होईल. याशिवाय केस नॅच्युरली चमकदार दिसतील.
केसांसाठी हळदीचा हेअर स्प्रे बनवण्याची योग्य पद्धत
केसांना काळे आणि चमकदार बनवण्यासाठी फक्त हळदीचा स्प्रे सुद्धा तुम्ही वापरू शकता. हळदीचा स्प्रे बनवण्यासाठी सगळ्यात आधी चमचाभर हळदीत एक कप पाणी मिसळा. यात तुम्ही एलोवेरा जेलसुद्धा घालू शकता. हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून व्यवस्थित मिसळून केसांच्या मुळांना लावा. त्यानंतर दीड तासांनी केस धुवा. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला केस काळेभोर आणि नेहमीपेक्षा जास्त शायनी झालेले दिसून येतील.
रोज २ वेळा धुवूनही चेहऱ्यावर पिंपल्स येतात? पाण्यात 'हा' पदार्थ मिसळा; ग्लोईंग, फ्रेश दिसेल चेहरा
हळद आणि नारळाचे तेल
नारळाचे तेल केसांच्या वाढीसाठी गुणकारी ठरते. एका वाटीत नारळाचे तेल घेऊन ते गरम करा. या तेलात तुम्ही हळद मिसळू शकता. (Coconut Oil) तेल हलकं गरम झाल्यानंतर केसांवर लावू शकता. नंतर तेलाची चंपी करा २० ते २५ मिनिटांनी केस स्वच्छ धुवून घ्या.