आपले केस जाड, मऊ, काळे आणि लांब असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी लोक काहीही करायला तयार होतात. कोणी तेल शोधतं तर कोणी हेअर मास्क वापरतं (hair Care Tips) या लेखात तुम्हाला असाच एक उपाय सांगत आहोत, जो वापरायला अगदी सोपा आहे, केसांच्या वाढीसाठीही तो खूप फायदेशीर आणि प्रभावी आहे. हा उपाय पेरूच्या पानांचा आहे. (Guava leaves for premature white hair make long strong and black how to use it)
पेरूची पानं
पेरूच्या पानांमध्ये अनेक पोषक घटक असतात. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असतात. केस आणि त्वचेसाठी हे फायदेशीर आहे. केसांसाठी पेरूची पाने तुम्ही अनेक प्रकारे वापरू शकता. पेरूच्या पानांचा केसांवर कसा वापर केला जातो जाणून घेऊया.
सगळ्यात आधी पेरूची15 ते 20 पेरूची पाने धुवून वाळवा. मिक्सरमध्ये पाण्यात मिसळून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट भांड्यात टाका. यानंतर केसांच्या टाळूवर लावा. काही मिनिटे बोटांनी मसाज करा. आता हेअरबँडच्या मदतीने केस बांधा आणि 30-40 मिनिटे राहू द्या. ते सुकल्यावर साध्या पाण्याने केस धुवा. केस धुण्यासाठी सौम्य शॅम्पू वापरा. आठवड्यातून दोनदा ते लावल्याने त्यांची वाढ वेगवान होईल आणि केस काळे व्हायला सुरुवात होईल.
असा वापर करा
पेरूची काही पाने धुवून ब्लेंडरमध्ये टाका आणि जाडसर पेस्ट तयार करा. आता त्यात छोटा कांदा टाकून प्युरी बनवा. आता एका कपड्यात ठेवून रस पिळून घ्या. आता पेरूच्या पानांची पेस्ट आणि खोबरेल तेल कांद्याच्या रसात मिसळा. ते टाळूवर लावा आणि बोटांनी चांगले मसाज करा. अर्ध्या तासानंतर स्वच्छ धुवा.
हिप्सवर बारीक दाणे, काळे डाग पडलेत? फक्त ४ उपाय, हिप्सवरील काळपट डाग कायमचे होतील दूर
पेरूच्या पानांचे पाणी
पेरूची काही पाने धुवून घ्या. आता त्यांना एक लिटर पाण्यात उकळवा. 15 ते 20 मिनिटे उकळल्यानंतर थंड होऊ द्या. थंड झाल्यावर गाळून बाटलीत साठवा. त्यानंतर सौम्य शाम्पूने केस धुवा. सुकल्यानंतर स्प्रे बाटलीच्या मदतीने केसांच्या मुळांवर लावा. 10 मिनिटे मसाज करा. पुढील काही तास केसांवर तसेच राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने केस धुवा.