Join us  

नारळाचे साल कचऱ्यात फेकता? थांबा, पांढरे केस काळेभोर होतील-या पद्धतीनं लावा नारळाचे साल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 4:48 PM

How to use coconut cover for hair dye on hair : डाय एकदा केसांना लावला की दर  १५ दिवसांनी किंवा महिन्याभराने केस काळे करावे लागतात. केमिकल्सच्या  वापरामुळे केसांची मुळंसुद्धा नाजूक होऊ शकतात.

केस पांढरे झाले की अनेकजण ग्लोबल कलर, हायलाईट करतात तर काहीजण घरच्याघरी मेहेंदी किंवा डाय लावतात. डाय एकदा केसांना लावला की दर १५ दिवसांनी किंवा महिन्याभराने केस काळे करावे लागतात. केमिकल्सच्या  वापरामुळे केसांची मुळं सुद्धा नाजूक होऊ शकतात. (How to Turn Black Hairs into Grey Naturally)

परिणामी हेअर फॉल वाढू शकतो. केसांच्या समस्या टाळण्यासाठी तुम्ही घरच्याघरी काही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स फॉल करू शकता. रोजच्या वापरातल्या काही वस्तू तुमच्या केसांच्या समस्या टाळण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. (Hair Care Tips)

१) होममेड हेअर कलर बनवण्यासाठी सगळ्यात आधी नारळाचे सालं बारीक तुकड्यांमध्ये चिरून घ्या. तुम्ही मोठ्या नारळ पाण्याचे साल किंवा छोट्या  नारळाचे सालही घेऊ शकता. सगळ्यात आधी नारळापासून वेगळे करा. मग त्यात कापूर घालून मासिचने पेटवा. (How to Make coconut shell dye to hide gray hair)

२) हे करण्यासाठी लोखंडाचा तवा किंवा कढई वापरा. हात भाजणार नाही याची काळजी घ्या. त्यात कलौंजी, काळ्या बीया, बदाम घालून भाजून घ्या. गॅसच्या हाय फ्लेमवरही हे पदार्थ भाजून घेऊ शकता.  सर्व पदार्थ गरम होऊन काळपट झाल्यानंतर गॅस बंद करा.  हे मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात भरून बारीक पावडर करून घ्या. 

ओटी पोट कमीच होत नाही? रामदेव बाबा सांगतात सकाळ संध्याकाळ ४ गोष्टी करा-स्लिम व्हा

३) ही पावडर एका डब्यात ठेवा. खाली कापड घालून मग त्यावर ही हे भांडं ठेवा अन्यथा फरशी काळपट होऊ शकते.  या पावडरमध्ये तेल घालून व्यवस्थित एकजीव करा. ही पेस्ट केसांना लावा.  त्यानंतर स्वच्छ पाण्याने केस धुवा. 

नारळाच्या सालीचे फायदे

१) नारळाची सालं  केस काळे करण्यासाठी उत्तम नैसर्गिक उपाय आहे. नारळाच्या सालीला कढईत गरम करून याची पावडर बनवून घ्या. ही पावडर नारळाच्या तेलात मिसळून केलांना लावल्या दुप्पटीने केस काळे होतात आणि नॅच्युरल रंग टिकून राहतो.

काहीही खाल्लं की दातांवर पिवळा थर येतो? २ मिनिटांत पांढरेशुभ्र दिसतील दात-करा 3 सोपे उपाय

२) नारळाचे साल दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. नारळाच्या सालीला जाळून त्याची पावडर बनवा. या पावडरमध्ये सोडा मिसळा आणि दातांवर व्यवस्थित लावा. यामुळे पिवळेपणा दूर होईल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी