Join us  

समोरचे केस जास्त पांढरे झाले? ना डाय, ना मेहेंदी-करा ५ उपाय; नव्याने येतानाच काळे येतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 1:20 PM

Grey Hair Solution Without Dying (Kes kale Karnyasathi Upay): एकदा केस पांढरे झाले की वारंवार पांढरे होऊ लागतात. डाय मेहेंदी लावण्याबाबत अनेकांच्या मनात भिती असते.

कमी वयात केस पांढरे होणं ही सध्याची एक मोठी समस्या आहे. (Grey Hair Home Remedies) केस पांढरे झाले की आपण वयस्कर दिसतोय असं वाटू लागतं. इतकंच नाही तर पर्सनॅलिटीसुद्धा खराब होते. (Grey Hair Solution) काळे-दाट केस प्रत्येकालाच आवडतात. एकदा केस पांढरे झाले की वारंवार पांढरे होऊ लागतात. डाय मेहेंदी लावण्याबाबत अनेकांच्या मनात भिती असते. कारण ते उपाय तात्पुरते रिजल्ट दाखवतात पण ते नेहमी करावे लागतात. (Kes kale kase karayche)

पांढरे केस काळे करण्यासाठी एक सोपा उपाय तुम्ही ट्राय करू शकता. (Only 2 Minutes White Hair Turn Black Naturally) केस पांढरे होऊ नयेत यासाठी तरूणपणापासूनच चांगला आहार घ्या. प्रोटीन्स,आयर्नयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. जर स्काल्पमध्ये रक्त पुरवठा व्यवस्थित  होत असेल तर केस पांढरे होणं टाळता येऊ शकतं.  (Pandhare kes kale karnyache upay) आठवड्यातून एकदा केसांची या तेलाने मसाज करा. यामुळे केस मुळापासून मजबूत होतील.

केसांना काळे करण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies For Grey Hairs)

१) महागडे आणि केमिकल्सयुक्त ब्युटी प्रोडक्ट्स विकत न घेता तुम्ही पांढऱ्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी काळ्या चहाचा वापर करू शकता काळ्या चहाने पांढरे केस काळे होण्यास मदत होईल. चहाची पावडर मेहेंदीत मिसळून केसांना लावा. यामुळे केस नैसर्गिकरित्या काळे होतील.

२) रोजमेरीची पानं आणि ओव्याच्या पानात बरेच एंजाईम्स असतात. ज्यामुळे केसांच्या मुळातील पिग्मेंट मेलामाईनला रिलिज करण्यास मदत करतात. याशिवाय केस मजबूत होतात. काळ्या चहात मेहेंदीची पानं आणि ओव्याची पानं मिसळून उकळून घ्या. थंड झाल्यानंतर पांढऱ्या केसांवर जवळपास १ तास लावून ठेवा. नंतर कोमट पाण्याने केस धुवून घ्या. या नैसर्गिक उपायाने केस काळे आणि चमकदार होण्यास मदत होईल.

३) पांढरे केस काळे करण्यासाठी कढीपत्त्याचा वापर तुम्ही करू  शकता. कढीपत्ता केसांच्या मुळांना काळे करतो याशिवाय केसांना मजबूत बनवतो. एका वाटीत नारळाचे तेल घेऊन कोमट करून घ्यात मूठभर कढीपत्ते घालून शिजवून घ्या. तेल शिजल्यानंतर गॅस बंद करा. हे तेल आठवड्यातून २ ते ३ वेळा केसांवर लावून ठेवा यामुळे केस काळे-दाट दिसतील.

४) एक चमचा काळी मिरी व्यवस्थित वाटून घ्या. त्यात लिंबाचा रस आणि अर्धा कप दही मिसळा ही पेस्ट केसांच्या मुळांना लावून ठेवा. आठवड्यातून ३ वेळा हा उपाय केल्याने केस नैसर्गिकरित्या काळे होतील. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स