केसात कोंडा, केस गळणे, केस अकाली पांढरे होणे, या समस्या लोकांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. मुख्य म्हणजे केस पांढरे होणे ही समस्या अनेकांना छळत आहे. केस अकाली पांढरे होणे ही समस्या अनेक कारणांमुळे निर्माण होऊ शकते. बिघडलेल्या जीवनशैली यासह योग्य आहार न घेणे यामुळे केस पांढरे होऊ शकतात. किंवा ही समस्या पित्त वाढीमुळे देखील होऊ शकते. शरीरात पित्त अनेक कारणांमुळे वाढते.
जेव्हा आपण तेल-मसाले किंवा आंबट पदार्थ जास्त प्रमाणात खातो. तेव्हा पित्त जास्त वाढते. जे लोकं भरपूर चहा, कॉफी पितात, त्यांचे देखील पित्त वाढते. जर आपल्याला आयुर्वेदिक पद्धतीने केस काळे करायचे असतील तर, आयुर्वेदिक डॉक्टर वरलक्ष्मी यनामांद्रा यांनी काही टिप्स सोशल मिडीयावर शेअर केले आहे. यामुळे केस नक्कीच काळे होण्यास मदत होईल(Grey Hair Treatment at Home - Ayurvedic Method).
वाढलेला पित्त दोष शांत करा
पोटाची उष्णता वाढल्याने केस लवकर पांढरे होतात. त्यामुळे गोड-कडू आणि तुरट चवीचा आहारात समावेश करा. तेलाऐवजी तुपाचा आहारात समावेश करा, पालेभाज्या व बडीशेप नियमित खा.
१ चमचा कोरफड जेलमध्ये मिक्स करा ‘एक’ खास पदार्थ, केस गळत होते हेच विसराल
या तेलाने स्काल्पची मसाज करा
शिरो अभ्यंग, ज्याला सामान्यतः हेड मसाज म्हणतात. जे विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींच्या तेलाने मसाज करून केले जाते. आपण नीली भृंगाडी तैलम किंवा भृंगराज तैलम सारख्या तेलाने मसाज करू शकता. या तेलाने मसाज केल्याने केसांची मुळं मजबूत होतात. यासह ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होते.
नाकात अणु तेल घाला
नाकात तेल घालण्यासाठी आपण अणू तेलाचा वापर करू शकता. हे तेल अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींचे मिश्रण तयार करून केले जाते. या तेलाचे दोन थेंब प्रत्येक नाकपुडीमध्ये रिकाम्या पोटी टाकावेत.
आपल्या स्काल्पवर हर्बल पेस्ट लावा
हा एक हर्बल उपचार आहे, यासाठी आवळा, कडुलिंब, खोबरे, शिककाई इत्यादी साहित्यांचा वापर करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट स्काल्पवर ४५ मिनिटे लावून ठेवा. यानंतर केस धुवा, यामुळे शरीरातील वाढलेला पित्तदोष शांत होतो.
कापूर करतो केसांवर जादू, ५ रुपयाच्या कापराचा पाहा सोपा उपाय
आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा करा वापर
आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण औषधी वनस्पतींचा वापर करू शकता. या उपायामुळे हार्मोन्स संतुलित होतात. ज्यामुळे केस गळणे आणि केस अकाली पांढरे होणे या समस्या कमी होतात.