वाढत्या वयात केस पांढरे होण्याची समस्या उद्भवते. (White Hairs Solution) सुरूवातीला एक ते दोन केस पांढरे होतात नंतर संपूर्ण डोकं पांढऱ्या केसांनी भरतं. बरेच लोक वेळेआधीच केस पांढरे होण्याच्या समस्येने त्रस्त असतात. आजकाल प्रदूषण, सुर्याची हानीकारक किरणं, जेनेटिक्स आणि केमिकल्सयुक्त प्रोडक्ट्स वपरल्यामुळे केस पांढरे होत आहे. (Hair Care Tips) अशा स्थितीत काही घरगुती उपाय करून तुम्ही केसांना काळे बनवू शकता. घरच्याघरी तयार करता येतील असा हेअर डाय लावून केस कायमचे काळेभोर बनवू शकता. या हेअर डायचा केसांवर परिणामही चांगला दिसून येतो. (How To Get Long Shine Black Hairs Using Home Remedies)
पांढऱ्या केसांसाठी हेअर मास्क कसा तयार करावा
पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी तुम्ही आवळ्याचा हेअर मास्क लावू शकता. आवळ्यात एंटीऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे स्काल्पमध्ये मेलेनिनचे प्रोडक्शन वाढण्यास मदत होते. याशिवाय केसांना गडद काळा रंग येतो. आवळ्याचा हेअर मास्क लावण्यासाठी हेअर मास्क तयार करताना एक कप मेहेंदी, ३ चमचा आवळा पावडर आणि एक चमचा कॉफी पावडरची गरजअसते. हा हेअर डाय बनवण्यासाठी भांड्यात ३ पदार्थ घालून पेस्ट तयार करा. हा हेअर मास्क केसांवर एक ते अर्धा तास लावून ठेवा नंतर केस धुवा. ज्यामुळे केसांवर गडद काळा रंग येईल.
तुळशीचा हेअर मास्क
या आयुर्वेदीक हेअर मास्क तयार करण्यासाठी तुळस आणि काळी चहापावडर मिसळून तयार करा. हा हेअर मास्क बनवण्यासाठी ४ चमचे काळा चहा आणि मूठभर तुळशीची पानं घ्या. वाटलेली चहा पावडर आणि तुळशीची पानं पाण्यात घालून व्यवस्थि उकळवून घ्या. जेव्हा पाणी व्यवस्थित उकळेल आणि पाण्याचा रंग बदलेल तेव्हा थंड करून घ्या आणि पाण्याने केस धुवून घ्या. आठवड्यातून २ वेळा या पाण्याने केस धुतल्यास पांढऱ्या केसांची समस्या उद्भवणार नाही.
शिकेकाई हेअर मास्क
शिकेकाईच्या वापराने केसांना भरपूर फायदे मिळतात. शिकेकाईच्या वापर तुम्ही नॅच्युरल शॅम्पूप्रमाणे करू शकता. यात हाय एंटी ऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे हेअर फॉलिकल्स ऑक्सिडेटिव्ह ताणापासून बचाव होतो आणि केस पांढरे होण्याची समस्या उद्भवत नाही. हेअर मास्क तयार करण्यासाठी ३ चमचे शिकेकाई पावडर ५ चमचे दह्यात मिसळून हेअर मास्क तयार करा. हा हेअर मास्क ४० ते ५० मिनिटं लावून नंतर केस धुवून घ्या.
मेहंदीचा हेअर मास्क
२ चमचे मेहंदीमध्ये १ चमचा कॉफी आणि एक चमचा नारळाचं तेल मिसळा त्यात पाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट डोक्याला १ तासासाठी लावून ठेवा नंतर केस धुवा. मेहंदीत एंटी ऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे केसांची निगा राखण्यास मदत होते.