Join us  

समोरचे केस खूप पांढरे झालेत? २ चमचे मेथीच्या हेअर पॅकची जादू; काळेभोर होतील पिकलेले केस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 4:09 PM

Grey Hairs Solution : मेथी कढीपत्त्याच्या पानांमध्ये मिसळून हेअर पॅक तयार करा. (Methi and curry leaves hair mask) मेथीत अनेक औषधी गुणधर्म आहेत. ज्याच्या वापरानं त्वचेपासून केसांना अनेक फायदे मिळतात.

त्वचा आणि केसांच्या समस्या आजकाल प्रत्येक तरूण-तरूणींमध्ये उद्भवतात. पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या हेअर केअर उत्पादनांचा वापर करतात. हेअर फॉल कंट्रोलसाठी (hair fall) काही घरगुती उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. मेथी कढीपत्त्याच्या पानांमध्ये मिसळून हेअर पॅक तयार करा. (Methi and curry leaves hair mask) मेथीत अनेक औषधी गुणधर्म आहेत. ज्याच्या वापरानं त्वचेपासून केसांना अनेक फायदे मिळतात. (Grey Hairs Solution)

१) मेथी आणि कढीपत्त्याचा पॅक (Fenugreek for hair growth)

सगळ्यात आधी १० कढीपत्त्याची पानं घ्या.  त्याबरोबर २ चमचे मेथीचे दाणे दळून घ्या. ही पेस्ट जास्त पातळ बनवू नका आणि केसांना लावा. नंतर हा पॅक केसांना व्यवस्थित लावा आणि अर्ध्या तासासाठी तसंच राहू द्या. नंतर केस स्वच्छ धुवून घ्या. एक आठवडा हा प्रयोग केल्यास केसांचा पोत सुधारण्यास मदत होईल.

मेथीच्या दाण्यांमध्ये अमिनो अॅसिड असते, जे केसांसाठी आवश्यक पोषक असते. दुसरीकडे, कढीपत्त्यात व्हिटॅमिन-बी कॉम्प्लेक्स असते, जे केस पांढरे होण्यावर नियंत्रण ठेवते. यासोबतच केस गळणे, तुटणे, स्प्लिट एंड्स कमी होऊन केसांची चमक परत येते.

१) मेथीचे दाणे शरीरातील अशक्तपणा दूर करतात. यामध्ये असलेले आयर्न रक्त वाढवण्यास मदत करते. गर्भधारणेदरम्यान आणि स्तनपान करवण्याच्या काळात लोहाची कमतरता असलेल्या महिलांसाठी मेथीचे दाणे उपयुक्त आहेत.

२) मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे. त्यात विरघळणारे तंतू असतात, जे रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतात.

३) मेथीच्या दाण्यांमध्ये लोह, फॉस्फरस, कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आढळतात, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. या लहान बियामध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म सांध्यातील सूज कमी करण्यास मदत करतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते रात्री एक चमचा मेथी दाणे पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी चावून खा. वेदना कमी करण्यासाठी हे प्रभावी सिद्ध होऊ शकते.

४) मेथीच्या दाण्यांमध्ये फायबर पुरेशा प्रमाणात आढळते, जे बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. पोटाची जळजळ कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे. तज्ज्ञांच्या मते, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत मेथीच्या पावडरचे सेवन करू शकता.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी