Join us  

केस पिकलेत, मेहेंदी-डाय आवडत नाही? चमचाभर कॉफीचा हेअर स्प्रे लावा, काळेभोर होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2023 9:36 AM

Grey Hairs Solution : पांढरे केस काळे करण्यासााठी काहीजण डाय लावतात तर काहीजण मेहेंदी.

केस पांढरे होण्याची समस्या सध्या लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांमध्येच उद्भवते.(Hair Care Tips) थायरॉईड, हार्मोनल बदल, प्रेग्नंसी यांसारख्या शारीरिक स्थितीत केस पांढरे होतात. केस काळे करण्यासाठी केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर केला जातो पण त्यामुळे हवातसा बदल केसांवर दिसत नाही. (Grey Hairs Home remedies)

पांढरे केस काळे करण्यासााठी काहीजण डाय लावतात तर काहीजण मेहेंदी. मेहेंदी पावडरमुळे केस रफ होतात तर रंग कधी कधी खूपच गडद येतो. तुम्हालाही डाय आणि मेहेंदी लावायला आवडत नसेल तर तुम्ही  घरगुती उपायांनी केसांची काळजी घेऊ शकता. 

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी पाणी उकळण्यासाठी ठेवा. त्यात दोन चमचे कॉफी घाला. कॉफी उकळल्यानंतर  १ चमचा चहा पावडर, १ चमचा कलौंजी, ३ ते ४ लवंग घाला. हे पाणी उकळ्यानंतर गाळून घ्या आणि थंड झाल्यावर एका स्प्रे बॉटलमध्ये भरा.  केसांच्या मुळांवर रात्री स्प्रे करा आणि सकाळी स्वच्छ पाण्यानं केस धुवून टाका. यामुळे केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यास मदत होईल आणि केस वारंवार पांढरे होणार नाहीत. (Premature Grey Hair Treatment With Home Remedies)

- स्प्लिट एंड्सपासून मुक्त होण्यासाठी आणि खराब झालेले केस दुरूस्त करण्यासाठी हा हेअर मास्क बनवा आणि लावा. ते बनवण्यासाठी एक अंडे घ्या आणि त्यात 2 चमचे कॉफी मिक्स करा. नीट मिसळल्यानंतर हा हेअर मास्क १५ ते २० मिनिटे केसांवर ठेवल्यानंतर धुवा. यामुळे केस दाट आणि मुलायम होतील.

- कॉफीचा हेअर मास्क लावल्यानंतर कोरडे केस मऊ होतात. ते लावण्यासाठी अर्धा कप खोबरेल तेल घ्या आणि त्यात एक चमचा कॉफी पावडर मिसळा. दोन्ही गोष्टी नीट मिक्स केल्यानंतर थोडा वेळ गॅसवर गरम करा. ते थोडे गरम झाल्यावर डोक्याला मसाज करून १५ मिनिटे ठेवा. यानंतर केस धुवून कंडिशनर लावा.

- कॉफी स्क्रबचा वापर स्काल्पची मृत त्वचा काढून टाकण्यासाठी केला जातो. स्कॅल्प एक्सफोलिएट करण्यासाठी, 2 चमचे कॉफीमध्ये 2 चमचे मध आणि पुरेसे खोबरेल तेल मिसळून पेस्ट बनवा. डोक्याला लावा, हलक्या हातांनी चोळा आणि सोबत धुवा.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स