Lokmat Sakhi >Beauty > ऐन तारूण्यात केस पिकले? ना डाय, ना कलर, तेलात हा पदार्थ मिसळून लावा, काळे होतील केस

ऐन तारूण्यात केस पिकले? ना डाय, ना कलर, तेलात हा पदार्थ मिसळून लावा, काळे होतील केस

Grey Hairs Solution : पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी फक्त अमोनिया बेस्ड हेअर कलरच नाही तर इतर उपायही फायदेशीर ठरू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 12:14 PM2023-05-28T12:14:54+5:302023-05-28T12:22:10+5:30

Grey Hairs Solution : पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी फक्त अमोनिया बेस्ड हेअर कलरच नाही तर इतर उपायही फायदेशीर ठरू शकतात.

Grey Hairs Solution : Natural Home Remedies For Grey Hair white hairs home remedies | ऐन तारूण्यात केस पिकले? ना डाय, ना कलर, तेलात हा पदार्थ मिसळून लावा, काळे होतील केस

ऐन तारूण्यात केस पिकले? ना डाय, ना कलर, तेलात हा पदार्थ मिसळून लावा, काळे होतील केस

आजकाल कमी वयातच केस पिकण्याची समस्या उद्भवल्यानं तरूण तरूणींचा आत्मविश्वास कमी होतो.  केस काळे करण्यासाठी त्यांना लहान वयातच पार्लर ट्रिटमेंट्स,  हेअर कलर असे पर्याय निवडावे लागतात.(Natural Home Remedies For Grey Hair) इतकं सगळं केल्यानंतरही केस पुन्हा पांढरे झाले की नैराश्य येतं. पांढऱ्या केसांमुळे आपण वयापेक्षा जास्त म्हतारे दिसू का?  केसांना पुन्हा काळं कसं करायचं असे अनेक प्रश्न लोकांना असतात. (Home Remedies for Gray Hair)

पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी फक्त अमोनिया बेस्ड हेअर कलरच नाही तर इतर उपायही फायदेशीर ठरू शकतात. केस पांढरे होण्याचं कारण फक्त खराब जीवनशैली नाही तर इतर समस्याही आहेत. वेळेआधीच केस पांढरे झाल्यास जास्त ताण न घेता काही नैसर्गिक उपायांनी तुम्ही केस पुन्हा काळे करू शकता. (Solutions to stop grey hair naturally)

पिकलेले केस पुन्हा काळेभोर करण्याचे घरगुती उपाय

१) सर्वप्रथम एक कप मोहरीचे तेल सोबत एक ग्लास पाणी, कढीपत्ता, कोरफडीचा तुकडा, कलोंजी, जवसाच्या बिया घ्या आणि काळे जिरे पण ठेवा.

२) एक ग्लास पाणी उकळून त्यात कढीपत्ता घाला. एक एलोवेराचे तुकडा घाला आणि पाण्यात एक चमचा आळशीसह जीरं, बडीशेप घाला. हे पाणि उकळून अर्ध झाल्यानंतर त्या पाण्यात एक कप राईचं तेल घालून पुन्हा उकळून घ्या. नंतर हे मिश्रण तेलाप्रमाणे दिसू लागेल. आठवड्यातून कमीत कमी दोनवेळा या तेलाचा वापर केल्यास पांढरे केस कमी होण्यास मदत होईल.

३) मोहरीचे तेल स्वयंपाकातही म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरले जाते, परंतु ते केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. यामुळे केसांचे पोषण तर होतेच पण डोक्यातील कोंडा आणि कोरड्या टाळूची समस्याही दूर होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोहरीच्या तेलाच्या सतत वापरामुळे केसांचा काळेपणाही कायम राहतो.

४) केसांना काळे करण्यासाठी ६ चमचे मोहोरीच्या तेलात २ चमचे नारळाचं तेल मिक्स करा. आता त्यात २ चमचे मेथीचे दाणे घाला आणि काही कढीपत्ता बारीक करून तेलाबरोबर व्यवस्थित  एकत्र करा. एक आठवड्यासाठी तुम्ही हे तेल साठवून ठेवू शकता.  हे तेल कोमट करून केसांच्या मुळांना लावून मालिश करा जवळपास अर्ध्यानं केस स्वच्छ पाण्यानं धुवा. महिन्यातून १५  दिवस हा उपाय केल्यास चांगला फरक दिसून येईल.
 

Web Title: Grey Hairs Solution : Natural Home Remedies For Grey Hair white hairs home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.