Join us  

केस खूपच पांढरे झालेत? ना हेअर डाय-ना मेहेंदी; ३ घरगुती उपाय देतील काळेभोर-लांब केस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2023 12:14 PM

Grey Hairs Solution : पांढरे केस दिसायला लांगले की आपण म्हातारे झालो की काय असं वाटू लागतं.  

आज लोकांच्या खाण्यापिण्यात आणि जीवनशैलीत बदल झाल्यानं त्याचा परीणाम त्वचा आणि केसांवरही दिसून येत आहे.  ताण-तणावामुळे केसाचं गळणं जास्त वाढलंय. तर हार्मोनल बदल केमिकल्सचा वापर यांमुळे पांढरे होत आहेत.  पांढरे केस दिसायला लांगले की आपण म्हातारे झालो की काय असं वाटू लागतं.  (Premature Grey Hair Treatment With Home Remedies) आधी केस पांढरे झाले म्हणजे हळूहळू वय वाढत चाललंय असं समजलं जायचं पण सध्या लहान मुलं, तरूण-तरूणींचेही केस पांढरे होतात. यामुळेच त्यांचा कॉन्फिडंस कमी होतो आणि केसांची कशी निगा राखावी हेच कळत नाही. (Grey Hairs Solution)

पांढरे केस लपवण्यासाठी लोक केमिकल्सयुक्त हेअर कलरचा वापर करतात. पण याचे फायदे कमी आणि नुकसान जास्त दिसून येते. यामुळे केस कोरडेसुद्धा होतात. केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात.  यामुळे केस मजबूत आणि शायनी राहतील.  (How to get rid from grey hairs)

१) एलोवेरा जेल

एलोवेरा जेल वापरून तुम्ही सिल्की, काळे, केस मिळवू शकता. त्यासाठी एलोवेरा जेल केसांच्या मुळांना लावून मालिश करा. सुकल्यानंतर शॅम्पूने केस व्यवस्थित धुवा.  २ ते ३ वेळा हा उपाय केल्यानं हळूहळू फरक दिसेल आणि हळूहळू केस काळे झाल्याचं दिसून येईल.

२) आवळा आणि रिठा

केसांना नैसर्गिकरित्या काळे बनवण्यासाठी आवळा आणि रिठा तुम्ही वापरू शकता. यासाठी एका लोखंडाच्या भांड्यात आवळा आणि रिठा घेऊन ही पावडर रात्रभर भिजवा.  सकाळी उठल्यानंतर केसांना लावा आणि केस सुकण्याची वाट पाहा.  नंतर केस स्वच्छ पाण्यानं धुवा. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय केल्यास चांगला परिणाम दिसून येईल.

३) कांद्याचा रस

कांदा केसांच्या समस्या दूर करण्यसाठी पूर्वापर वापरला जात आहे. पांढरे केस काळे करण्यासाठी तुम्ही कांद्याचीही मदत घेऊ शकता. कांदा मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा रस काढा आणि नंतर टाळूला लावा.  सुकल्यावर सौम्य शाम्पूने  केस धुवा. कांद्याच रस मेथीच्या बीयांच्या पेस्टमध्ये मिसळून केसांना लावल्याने फायदे मिळतात. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स