Join us  

कितीही मॉइश्चरायझर चोपडलं तरी स्किन ड्राय दिसते ? पाहा ‘ही’ योग्य पद्धत, मिळेल मऊ त्वचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2024 6:57 PM

This Is the Best Way to Apply Moisturizer : Guide to Moisturizer for Dry Skin : मॉइश्चरायझर लावल्यानंतरही त्वचा कोरडी पडत असेल तर मॉइश्चरायझर लावण्याची योग्य पद्धत नेमकी कोणती ते पाहा...

स्किनला मॉइश्चराइज करणे हा आपल्या डेली स्किन केअर रुटीनचा भाग आहे. त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेण्यासाठी रोज तिला मॉइश्चराइज करावे लागते. मॉयश्चरायझर त्वचेला हायड्रेट आणि पोषण करण्यास मदत करते. त्याचबरोबर कोरडेपणा टाळण्यासाठी, त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी तसेच त्वचेला मऊ आणि मुलायम करण्यास मदत करते. मॉइश्चरायझरचा वापर आपण वर्षाचे बाराही माहिने करतोच. परंतु हिवाळ्यात थंडीमुळे त्वचा कोरडी होऊ नये म्हणून मॉइश्चरायझर लावले जाते. याचबरोबर त्वचा जास्तच कोरडी किंवा निर्जीव दिसत असेल तर मॉइश्चरायझर लावणे गरजेचे असते. यामुळे त्वचा मऊ, मुलायम होण्यास मदत होते(How to Moisturize Your Face).

परंतु काहीवेळा मॉइश्चरायझर लावून देखील आपली त्वचा आहे तशीच कोरडी व निर्जीव दिसते. आपण सगळेचजण त्वचेला मॉइश्चरायझर लावून त्वचा मॉइश्चराइज करत असतो परंतु प्रत्येकाची मॉइश्चरायझर लावण्याची पद्धत ही वेगवेगळी असते.आपल्यापैकी बऱ्याचजणांना हा अनुभव आला असेल की, कितीही  मॉइश्चरायझर लावून देखील आपली त्वचा सारखी (This Is the Best Way to Apply Moisturizer) कोरडी पडते आहे. बरेचजण, नेमकी इथेच चूक करतात. वारंवार ही चूक सतत होत राहते. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो. अशावेळी मॉइश्चरायझर लावण्याची आपली पद्धत ही कदाचित चुकीची असू शकते. त्यामुळे त्वचेला योग्य पद्धतीने मॉइश्चराइज कसे करावे याची नेमकी योग्य पद्धत कोणती हे पाहूयात(Guide to Moisturizer for Dry Skin). 

मॉइश्चरायझर लावल्यानंतरही त्वचा कोरडी का पडते ? 

१. त्वचेला सूट न होणारे चुकीचे मॉइश्चरायझर लावल्यामुळे त्वचेला योग्य मॉइश्चरायझेशन मिळत नाही आणि त्यामुळे त्वचा कोरडी पडते. २. त्वचेतच नैसर्गिक ओलावा नसल्यामुळे मॉइश्चरायझर लावल्यानंतरही त्वचा कोरडी होऊ शकते. ३. त्वचेवर जास्त मॉइश्चरायझर लावल्याने त्वचेवर याचा नकारात्मक परिणाम होतो आणि त्वचा कोरडी होते. ४. चुकीच्या साबणाने किंवा फेसवॉशने वारंवार चेहरा धुतल्याने त्वचा अधिक जास्त प्रमाणांत कोरडी होते.  ५. आहारात आवश्यकतेपेक्षा जास्त मीठ असल्यास, मॉइश्चरायझर लावल्यानंतरही तुमची त्वचा कोरडी राहू शकते. 

केसांची देखभाल करायलाच वेळ नाही, घ्या हे ६ सुपर हॅक्स- एका मिनिट वेळ दिला तरी केस होतील सुंदर...

फेस वॅक्सिंग केल्यावर त्वचेची आग होते? ४ सोपे उपाय, जळजळ-रॅश हा त्रास होणार नाही...

त्वचेला मॉइश्चराइज करण्याची योग्य पद्धत कोणती ? 

१. मॉइश्चरायझर लावण्याआधी तुमची त्वचा संपूर्णपणे स्वच्छ करा. 

२. आता त्वचा टॉवेलने संपूर्णपणे पुसून कोरडी करून घ्यावी.  ३. यानंतर, आपल्या बोटाच्या टोकावर मॉइश्चरायझर घ्या आणि मानेवर आणि चेहऱ्याच्या त्वचेला लावा. आवश्यकतेपेक्षा जास्त मॉइश्चरायझर वापरणे किंवा कमी प्रमाणात वापरणे टाळा. मॉइश्चरायझर डायरेक्ट त्वचेला लावून त्वचा घासू नका. मॉइश्चरायझर बोटांच्या मदतीने त्वचेवर टॅप करा.  

४. आपल्या तळहातांवर मॉइश्चरायझर हलकेच चोळून घ्यावे आणि मगच ते ज्या भागावर लावायचे आहे तिथे लावावे यामुळे मॉइश्चरायझर त्वचेमध्ये योग्यरित्या शोषले जाईल. 

५. कपाळ, गाल, नाक आणि हनुवटीच्या भागावर मॉइश्चरायझर लावा.   ६. ज्या भागात त्वचा अधिक कोरडी होते अशा भागांवर मॉइश्चरायझर जरूर लावावे. जसे की, डोळ्यांच्या आजूबाजूच्या किंवा ओठांच्या आजूबाजूला त्वचा अधिकच कोरडी होते. 

७. मॉइश्चरायझर त्वचेमध्ये शोषून घेण्यासाठी थोडा वेळ द्या आणि त्यानंतरच त्वचेवर सनस्क्रीन लावा. ८. गरज वाटल्यास तुम्ही पुन्हा त्वचेवर मॉइश्चरायझर लावू शकता.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी