Lokmat Sakhi >Beauty > ओठ काळे पडलेत त्याला कारण तुमच्या ६ सवयी; २ घरगुती उपाय, ओठ होतील गुलाबी- मुलायम

ओठ काळे पडलेत त्याला कारण तुमच्या ६ सवयी; २ घरगुती उपाय, ओठ होतील गुलाबी- मुलायम

Beauty tips: आपलेच ओठ असे काळे पडलेले, रखरखीत का? असा प्रश्न पडला असेल तर ही माहिती नक्की वाचा.. कारण या  ६ चुकीच्या सवयींमुळे ओठ हमखास काळे पडतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2022 03:04 PM2022-02-11T15:04:54+5:302022-02-11T15:06:06+5:30

Beauty tips: आपलेच ओठ असे काळे पडलेले, रखरखीत का? असा प्रश्न पडला असेल तर ही माहिती नक्की वाचा.. कारण या  ६ चुकीच्या सवयींमुळे ओठ हमखास काळे पडतात..

Habits that make your lips dark, home remedies for soft pink lips | ओठ काळे पडलेत त्याला कारण तुमच्या ६ सवयी; २ घरगुती उपाय, ओठ होतील गुलाबी- मुलायम

ओठ काळे पडलेत त्याला कारण तुमच्या ६ सवयी; २ घरगुती उपाय, ओठ होतील गुलाबी- मुलायम

Highlights'या' सवयी सोडून द्या आणि काही घरगुती उपाय करा

आपल्या सभोवती काही मैत्रिणी असतात, त्यांचे ओठ नेहमीच गुलाबी, मऊ, कोणत्याही भेगा नसलेले  असतात.. त्याउलट काही जणींचे ओठ मात्र काळवंडलेले आणि भेगा पडून रखरखीत झालेले असतात..  हिवाळ्याच्या दिवसात तर अशा ओठांचं दुखणं आणखीनच वाढतं.. याला कारण आहेत आपल्या काही चुकीच्या सवयी. या सवयी सोडून द्या आणि काही घरगुती उपाय करा (home remedies for dark lips).. मग बघा तुमचेही ओठ कसे मृदू, मुलायम आणि गुलाबी दिसतात ते.. 

 

ओठांना काळं बनविणाऱ्या चुकीच्या सवयी (reasons for dark lips)
१. ओठांना कधीही स्क्रब न करणं..

काळा पडलेला म्हणजेच टॅन झालेला चेहरा डिटॅन करण्यासाठी किंवा मग त्वचेवरची डेड स्किन काढून टाकण्यासाठी त्वचेला अधून मधून स्क्रब करणं गरजेचं असतं.. तसंच काहीसं ओठांचं असतं.. चेहऱ्याप्रमाणे जर ओठांनाही नियमितपणे स्क्रबिंग केलं तर ओठंही राहतील गुलाबी. तसेच प्रत्येक जेवणानंतरही ओठांना पाणी लावून ते बोटाने चोळले पाहिजेत. 

 

२. खूप गरम चहा- कॉफी पिणं..
काही जणींना खूप गरमागरम चहा- कॉफी पिण्याची सवय असते. ही सवय ओठांच्या दृष्टीने अतिशय चुकीची आहे. यामुळे ओठांना वारंवार चटका बसतो. चहा- कॉफीचा गरमपणा त्यांना सहन होत नाही. त्यामुळे मग ओठ काळे पडू लागतात.

 

३. स्मोकिंग.. 
ओठांना काळं बनविणारी ही एक वाईट सवय.. महिलांचं, तरूणींचं स्मोकिंग करण्याचं प्रमाण दिवसागणिक वाढत आहे.. ओठ काळवंडून टाकणारी ही सवय आरोग्यासाठीही अतिशय घातक आहे. त्यामुळे अशी सवय असेल तर ती लवकरात लवकर सोडा.

४. ओठ चावणे
काही जणांना वारंवार दाताखाली ओठ चावण्याची किंवा ओठांवरून वारंवार जीभ फिरविण्याची सवय असते. ही सवय ओठांचं नुकसान करते. या सवयीमुळे ओठ एकतर काळे पडतातच शिवाय त्यांचा आकारही खराब होतो.

 

५. ओठांना माॅईश्चरायझर लावणे
ओठ मऊ, मुलायम आणि गुलाबी ठेवायचे असतील, तर त्यांना दिवसातून दोन वेळा मॉईश्चरायझर लावणे गरजेचे आहे.

६. हलक्या दर्जाचे कॉस्मेटिक्स वापरणे 
लिपस्टिक, लिपलायनर, लिपग्लॉस हे कॉस्मेटिक्स जर हलक्या दर्जाचे वापरले तरी देखील ओठांचे खूप नुकसान होते. कारण या हलक्या कॉस्मेटिक्समध्ये खूप जास्त केमिकल्स असतात आणि ते ओठांना सहन होत नाहीत. त्यामुळे कमी प्रोडक्ट्स वापरा पण ते ब्रॅण्डेडच असू द्या, असं सौंदर्यतज्ज्ञ सांगतात. 

 

ओठ गुलाबी करण्यासाठी...
१. एक टीस्पून पिठीसाखर आणि १ टी स्पून मध घ्या. हे मिश्रण एकत्र करा आणि त्याने ओठांना मसाज करा.. ओठांवरची डेड स्किन निघून जाईल. साखर आणि मधात असणारे घटक ओठांचं पोषण करतील.
२. हळद आणि तूप एकत्र करा. हा पॅक ओठांवर लावा. १० मिनिटांनी हलक्या हाताने चोळून ओठ धुवून टाका. 

 

Web Title: Habits that make your lips dark, home remedies for soft pink lips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.